Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:53 PM2018-12-11T16:53:54+5:302018-12-11T16:54:17+5:30

 पाच राज्यांमध्य्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.

Assembly Election 2018 Results: The voters rejected the untoward, Uddhav Thackeray attack on BJP | Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मुंबई -  पाच राज्यांमध्य्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धल ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे. ''नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले. पर्याय कोण या प्रश्नात गुंतून न पडता नको असलेल्यांना नाकारणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो,'' अशा शब्दात विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालांचे शिकसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. 

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,  निवडणुकीत हार जीत तर होतच असते. जिंकतो त्याचे अभिनंदन होत असते. पण या चार राज्यात परिवर्तन घडवणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी इव्हीएम, पैसेवाटप, गुंडगिरी आणि पर्याय कोण? या प्रश्नांमध्ये अडकून न पडता जे नको आहेत, त्यांना नाकारले. मतदारांच्या या धाडसाने देशाला दाखवलेली ही दिशा आहे.'' 
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये  काँग्रेसने जबरदस्त यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाची 15 वर्षांपासूनची काँग्रेसची सत्ता उखडून टाकत काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवले. तर राजस्थानमध्येही काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. तर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसकडून भाजपाला टक्कर मिळत आहे.   

Web Title: Assembly Election 2018 Results: The voters rejected the untoward, Uddhav Thackeray attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.