अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिडहल्ला, एकतर्फी प्रेमातून प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:56 AM2017-12-06T03:56:44+5:302017-12-06T03:56:53+5:30

एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना येथील शिवटेकडीच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळी घडली.

Asidhalla, a kind of love with a minor girl | अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिडहल्ला, एकतर्फी प्रेमातून प्रकार

अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिडहल्ला, एकतर्फी प्रेमातून प्रकार

Next

अमरावती : एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना येथील शिवटेकडीच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळी घडली. चार संशयित तरुणांना फ्रेजरपुरा व कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकते. शाळा सुटल्यावर सायकलने ती घरी निघाली होती. शिवटेकडीपासून काँग्रेसनगरकडे जाणाºया अरुंद रस्त्यावर पोहोचताच दुचाकीस्वार तीन मुलांनी तिला गाठले. त्यापैकी एकाने पिचकारीसम बाटलीतून तिच्या चेहºयावर अ‍ॅसिड फेकले. काय घडले, हे त्या मुलीला कळण्याच्या आतच ते पसार झाले.
अ‍ॅसिडने चेहरा भाजल्यामुळे तळमळणाºया त्या मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली. शिवटेकडीवर व्यायामासाठी आलेली एक मुलगी मदतीसाठी धावून गेली. तिने स्कुटरवर बसवून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अ‍ॅसिडहल्ल्यात अल्पवयीन मुलीचा उजवा गाल, मान आणि छातीचा काही भाग भाजून निघाला. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी मुलगी १२ टक्के भाजल्याचे आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने पीडित मुलीला गाठून पे्रम व्यक्त केले होते. तो तिला वारंवार त्रास देत होता. संतापलेल्या त्या मुलीने त्याला थप्पड लगावली होती. बहुधा त्याच घटनेचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला असावा, असा नातेवाइकांचा अंदाज आहे.

Web Title: Asidhalla, a kind of love with a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा