Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:04 PM2019-06-24T14:04:18+5:302019-06-24T14:06:08+5:30

जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात.

Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019; Sant Dnyaneshwar Wari Schedule with Route & Time Table | Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

googlenewsNext

पुणे -  महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीचं ओढ सर्व पांडुरंगाच्या भक्तांना लागून राहिली आहे. यंदा 12 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे राज्याच्या विविध कोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. शेगावहून गजानन महाराजांची पालखी निघाली आहे. संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताई यांच्या पालख्या पंढरपूरसाठी रवाना झाल्या आहेत. अवघ्या वारकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 24 जून रोजी संत तुकाराम महाराज आणि 25 जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. 

जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. 

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक 

मंगळवार,  २५  जून २०१९   
श्री क्षेत्र आळंदीपासून पालखीचे प्रस्थान दुपारी ४ वाजता
गांधीवाडा - आळंदी ( पालखीचा मुक्काम ) 

बुधवार , २६ जून २०१९
थोरल्या पादुका ( आरती ) 
भोसरी फाटा (सकाळचा विसावा ) 
फुलेनगर ( दुपारचा नैवेद्य ) 
वाकडेवाडी ( दुपारचा विसावा ) 
पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ ( रात्रीचा मुक्काम ) 

गुरुवार , २७ जून २०१९
पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ , पुणे ( रात्रीचा मुक्काम ) 

शुक्रवार , २८ जून  २०१९ 
शिंदे छत्री ( आरती ) ( सकाळचा विसावा ) 
हडपसर ( दुपारचा नैवेद्य ) 
१ ) उरूळी देवाची , २ ) वडकी नाला ३ ) झेंडेवाडी ( दुपारचा विसावा ) 
सासवड ( रात्रीचा मुक्काम ) 

शनिवार , २९  जून  २०१९
सासवड ( रात्रीचा मुक्काम )

रविवार , ३०  जून  २०१९
बोरवके मळा ( सकाळचा विसावा ) 
यमाई - शिवरी ( दुपारचा नैवेद्य ) 
साकुर्डे ( दुपारचा विसावा ) 
जेजुरी ( रात्रीचा मुक्काम ) 

सोमवार , १ जुलै  २०१९
१ ) दौंडज शिव २ ) दौंडज ( सकाळचा विसावा ) 
वाल्हे ( दुपारचा नैवेद्य ) 
वाल्हे ( रात्रीचा मुक्काम ) 

मंगळवार , २ जुलै  २०१९
पिंपरे खुर्द विहीर ( सकाळचा विसावा ) 
नीरा ( दुपारचा नैवेद्य ) 
श्रींचे नीरास्नान ( दुपारचा विसावा ) 
लोणंद ( रात्रीचा मुक्काम ) 

बुधवार , ३ जुलै  २०१९
लोणंद ( दुपारचा नैवेद्य ) 
चांदोबाचा लिंब - उभे रिंगण - १ ( दुपारचा विसावा ) 
तरडगाव ( रात्रीचा मुक्काम ) 

गुरुवार , ४ जुलै  २०१९
१ ) दत्तमंदिर , काळज २ ) सुरवडी ( सकाळचा विसावा ) 
निंभोरे ओढा ( दुपारचा नैवेद्य ) 
वडजल ( दुपारचा विसावा ) 
फलटण विमानतळ ( रात्रीचा मुक्काम ) 

शुक्रवार  , ५ जुलै  २०१९
विडणी ( सकाळचा विसावा ) 
पिंपरद ( दुपारचा नैवेद्य ) 
निंबळक फाटा ( दुपारचा विसावा ) 
बरड ( रात्रीचा मुक्काम ) 

शनिवार , ६ जुलै  २०१९ 
साधुबुवाचा ओढा ( सकाळचा विसावा ) 
धर्मपूरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ ( दुपारचा नैवेद्य ) 
शिंगणापूर फाटा पानसकरवाडी ( दुपारचा विसावा ) 
नातेपुते ( रात्रीचा मुक्काम) 

रविवार , ०७ जुलै २०१९
मांढवी ओढा ( दुपारचा नैवेद्य ) 
१ ) सदाशिवनगर - गोलरिंगण - १ , 
२ ) पुरंदावडे ( दुपारचा विसावा ) 
माळशिरस ( रात्रीचा मुक्काम ) 

सोमवार , ०८ जुलै  २०१९
खुडुस फाटा - गोल रिंगण - २ ( सकाळचा विसावा ) 
विंझोरी ज्ञानेश्वरनगर ( दुपारचा नैवेद्य ) 
धावा - बावी माऊंट ( दुपारचा विसावा ) 
वेळापूर ( रात्रीचा मुक्काम ) 

मंगळवार , ०९ जुलै  २०१९
ठाकूरबुवाची समाधी - गोल रिंगण - ३ ( सकाळचा विसावा ) 
तोंडले - बोंडले ( दुपारचा नैवेद्य ) 
टप्पा ( दुपारचा विसावा ) 
भंडीशेगाव ( रात्रीचा मुक्काम )

बुधवार , १० जुलै २०१९
भंडी शेगाव ( दुपारचा नैवेद्य ) 
बाजीरावाची विहिर - उभे रिंगण - २ , गोल रिंगण - ४ ( दुपारचा विसावा ) 
वाखरी तळ ( रात्रीचा मुक्काम )

गुरुवार  , ११ जुलै २०१९
वाखरी ( दुपारचा नैवेद्य ) 
पादुकेजवळ उभे रिंगण - ३ - आरती ( दुपारचा विसावा ) 
पंढरपूर ( रात्रीचा मुक्काम )

शुक्रवार , १२ जुलै २०१९
भागवत एकादशी , आषाढी यात्रा पंढरपूर
दुपारी - श्रींचे चंद्रभागा स्नान  

मंगळवार,  १६ जुलै २०१९
श्रींचे चंद्रभागा स्नान, विठ्ठल रुक्मिणी भेट 

बुधवार - १७ जुलै २०१९
माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु 

Web Title: Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019; Sant Dnyaneshwar Wari Schedule with Route & Time Table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.