सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणखी एका महाराजांची एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:37 PM2019-07-10T14:37:31+5:302019-07-10T15:01:27+5:30

खासदार जयसिध्देश्वर महाराजांचे एकेकाळचे सहकारी आता काँग्रेसकडून इच्छुक

Another Maharaja's entry in Solapur district's politics | सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणखी एका महाराजांची एंट्री

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणखी एका महाराजांची एंट्री

googlenewsNext
ठळक मुद्दे- नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी काँग्रेसच्या वाटेवर- सोलापूर जिल्ह्यातील राजकीय चर्चेला उधाण- अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिध्दाराम म्हेत्रे भाजपचे वाटेवर

सोलापूर : नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास काँग्रेसकडून इच्छुक असल्याचा अर्ज बुधवारी काँग्रेस भवनमध्ये केला आहे. त्यामुळे भाजपचे खासदार डॉ़ जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यासाठी प्रयत्न केलेले केलेले श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी अद्याप आॅक्टोबरमध्ये होणाºया विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा अर्ज काँग्रेस भवनाकडे केलेला नाही ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी नामदेव पांढरे या आपल्या सेवकामार्फत काँग्रेसभवनमध्ये इच्छुक म्हणून अर्ज सादर केला आहे़ याला मैंदर्गी मठाचे मठाधिपती नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांचा पाठींबा आहे़ हे दोघे खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या विजयासाठी काम केले आहे.

विशेष म्हणजे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गौडगावचे डॉ. जयसिद्धेश्वरांचा भाजप प्रवेश व त्यांना उमेदवारी आणण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट यामध्ये ते सक्रिय होते. आता त्यांनी चक्क काँग्रेसकडे उमेदवारी मागितल्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसमध्येही महाराज दिसणार अशी चर्चा काँग्रेसभवनमध्ये सुरू झाली आहे.

Web Title: Another Maharaja's entry in Solapur district's politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.