सहायक कक्ष अधिकारीपदाचा निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:27 AM2019-03-21T05:27:17+5:302019-03-21T05:28:20+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ (सहायक कक्ष अधिकारी) पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

 Announcing the results of the Assistant Room Officer | सहायक कक्ष अधिकारीपदाचा निकाल जाहीर

सहायक कक्ष अधिकारीपदाचा निकाल जाहीर

Next

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ (सहायक कक्ष अधिकारी) पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील रोहन अर्जुन कराळे हे राज्यातून आणि मागासवर्गातून प्रथम आले आहेत. बीड जिल्ह्यातील प्रियंका भास्कर मिसाळ या महिलावर्गातून राज्यात प्रथम आल्या आहेत.
‘एमपीएससी’तर्फे दि. २६ आॅगस्ट आणि दि. २७ आॅक्टोबर २०१८ रोजी एकूण १२६ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती.
त्याचा निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण आणि तपशीलवार यादी एमपीएससीच्या संंकेतस्थळावर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा २०१८चा निकाल मंगळवारी (दि. १९) जाहीर झाला आहे.

Web Title:  Announcing the results of the Assistant Room Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.