Announce help to rain affected farmers, learn about how much compensation will get on diffrent crops | गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत जाहीर, जाणून घ्या प्रतिहेक्टरी कुठल्या पीकावर किती मिळणार नुकसान भरपाई

ठळक मुद्देशेत पीकाच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शेतक-यांना ही मदत मिळणार आहे. पीक विमा काढलेल्या शेतक-यांना जास्तीत जास्त रक्कम मिळेल.

मुंबई- अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना शासनाकडून मदत जाहीर झाली आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी दुपारी मदतीची घोषणा केली. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेत पीकाच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शेतक-यांना ही मदत मिळणार आहे. पीक विमा काढलेल्या शेतक-यांना जास्तीत जास्त रक्कम मिळेल. त्याचप्रमाणे पीक विमा न काढलेल्या शेतक-यांनाही मदत दिली जाईल. 

कुठल्या पीकाला किती रक्कम 

-    ज्वारी, मका गहूसाठी प्रतिहेक्टर 6,800 रुपये मिळणार 
-  सिंचनातील जमिनीसाठी प्रतिहेक्टर 13,500 रुपये मदत दिली जाईल.
- मोसंबी, संत्र प्रतिहेक्टर 23,300 रुपये मिळणार.  
- आंबा प्रतिहेक्टर 36 हजार 700 रुपये मदत दिली जाईल.  
- केळी प्रति हेक्टर 40 हजार रुपये मदत दिला जाईल. 
-  लिंबू प्रतिहेक्टर 20 हजार रुपये मदत दिली जाईल.
- हरभरा, सुर्यफूल प्रतिहेक्टर 6800 रुपये  मिळणार.
- पीकविमा न काढलेल्यांना प्रतिहेक्टर 18 हजार रुपये मदत दिली जाईल. 


Web Title: Announce help to rain affected farmers, learn about how much compensation will get on diffrent crops
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.