...आणि ‘त्या’ आॅडिओ क्लिपचे सत्य उलगडले, दु:खाच्या प्रसंगीही शहीद राणे यांच्या कुटुंबीयांचा समजूतदारपणा''

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:43 AM2018-08-17T04:43:41+5:302018-08-17T04:44:15+5:30

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने एक खोटी आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

 ... and 'that' revealed the truth of the audio clips | ...आणि ‘त्या’ आॅडिओ क्लिपचे सत्य उलगडले, दु:खाच्या प्रसंगीही शहीद राणे यांच्या कुटुंबीयांचा समजूतदारपणा''

...आणि ‘त्या’ आॅडिओ क्लिपचे सत्य उलगडले, दु:खाच्या प्रसंगीही शहीद राणे यांच्या कुटुंबीयांचा समजूतदारपणा''

Next

मुंबई - शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने एक खोटी आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचताच, दहिसरच्या एका तरुणीने ही आॅडिओ क्लिप व्हायरल केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आपण कुठल्याही स्वार्थी अथवा चुकीच्या उद्देशाने ती बनवली नसल्याचे सांगत तिने राणे कुटुंबीयांची माफी मागितली. तरुणीचे नुकतेच लग्न ठरले असल्याने तिचे नुकसान होऊ नये म्हणून दु:खाच्या प्रसंगीही राणे कुटुंबीयांनीही समजूतदारपणा दाखवत ते प्रकरण तेथेच मिटवले.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. याच दरम्यान त्यांच्या पत्नीच्या नावाने एक खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये शहीद राणे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. ती आॅडिओ क्लिप खोटी असल्याचे राणे यांच्या पत्नीकडून समजताच नानाविध चर्चांना पेव फुटले.
अखेर राणे यांचे नातेवाईक मिहीर यांनी समतानगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात यामागे दहिसरच्या तरुणीचा सहभाग उघड झाला. त्यानुसार, मंगळवारी तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. या वेळी राणे यांचे नातेवाईकही हजर झाले.
फक्त देशभक्तीतून ती आॅडिओ क्लिप व्हायरल केली. यामध्ये आपला कुठलाही स्वार्थी हेतू नसल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. शहीद राणे यांच्या कुटुंबीयांना झालेल्या नाहक त्रासाबद्दल तिने माफीही मागितली. शिवाय आपले लग्न ठरले असून प्रकरण मागे घेण्याबाबत विनंती केली. राणे कुटुंबीयांनीही तेथेच ते प्रकरण मिटवले. त्यामुळे या प्रकरणात पुढे कुठल्याही स्वरूपाची कारवाई होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  ... and 'that' revealed the truth of the audio clips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.