Ganesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 07:10 PM2018-09-23T19:10:16+5:302018-09-23T19:16:13+5:30

गणेश विसर्जन मिरवणूकीत रथात, टेम्पोमध्ये, हातावर मिरवत बाप्पा बघण्याची आपल्याला सवय आहे.

..... and Ganpati Bappa came from the car | Ganesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा

Ganesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा

Next

पुणे :गणेश विसर्जन मिरवणूकीत रथात, टेम्पोमध्ये, हातावर मिरवत बाप्पा बघण्याची आपल्याला सवय आहे. पण पुण्यात मात्र मोटार गाडीतून आलेले बाप्पा बघायला मिळाले आणि त्यांचा एक फोटो घेण्यासाठी उपस्थितांची धावपळ झाली.

           पुण्यात यंदाची विसर्जन मिरवणूक जोरदार सुरू आहे.  मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जनही झाले आहे.  याचवेळी लाखो घरगुती गणपतींचेही विसर्जन करण्यात येते.  अशावेळी वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला जातो.  अशाच पद्धतीने पुण्यातील डॉ मिलिंद संपगावकर यांनी अभिनव पद्धतीने निरोप देताना बाप्पांना चक्क मोटरगाडीतून आणले. त्यांनी गणरायांना घेऊन जाताना अनेकांनी गर्दी केली होती. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, माझी काही दिवसांपूर्वी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे मला गणपती उचलणे शक्य नव्हते. अशावेळी मी मुलांच्या गाडीचा वापर केला आहे. ही आमची मिरवणूक अल्पखर्चात झाली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: ..... and Ganpati Bappa came from the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.