अमरावतीत ५६ एड्सग्रस्त पुन्हा उपचाराच्या प्रवाहात, राज्यभरात जनजागृती मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 06:02 PM2018-08-12T18:02:13+5:302018-08-12T18:02:39+5:30

एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, पण औषधोपचार न घेणा-या ५६ पैकी २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जुलैपासून शोधमोहीम राबविली.

Amravati 56 AIDS-ridden Rehabilitation In Stream, Awareness Campaign In The State | अमरावतीत ५६ एड्सग्रस्त पुन्हा उपचाराच्या प्रवाहात, राज्यभरात जनजागृती मोहीम

अमरावतीत ५६ एड्सग्रस्त पुन्हा उपचाराच्या प्रवाहात, राज्यभरात जनजागृती मोहीम

Next

- वैभव बाबरेकर 

अमरावती : एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, पण औषधोपचार न घेणा-या ५६ पैकी २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जुलैपासून शोधमोहीम राबविली. एड्सग्रस्तांच्या शोधासाठी राज्यभरात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. 
काही एड्सग्रस्त उपचारापासून दूर पळत असल्याचे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आले. त्याअनुषंगाने प्रकल्प संचालक परिमल सिंग यांनी या मोहिमेची संकल्पना अमंलात आणली. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षाकडे ५ हजार ८३० रुग्णांच्या नोंदी आहेत. त्यापैकी ४ हजार ८१९ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ५६ रुग्ण आजपर्यंत उपचारासाठी आले नाही. त्यानंतर झालेल्या २४३ नोंदणीकृत रुग्णसुद्धा उपचारासाठी आलेच नाही. यापैकी काहींवर उपचार सुरूअसून, १६२ रुग्णांनी मध्येच उपचार सोडल्याचे निदर्शनास आले. १ जुलै ते ३१ आॅक्टोबरपर्यंत या मोहिमेत जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष व स्वयंसेवी संस्थामार्फत उपचार न घेणा-या एड्सग्रस्त रुग्णांची शोध घेतला. त्यावेळी २६ रुग्णांनी औषधोपचारासाठी होकार दर्शविला. पुढेही ही शोध मोहीम सुरू असून सर्वच रुग्णांना औषधोपचार देण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षातर्फे प्रयत्न सुरू आहेत. एड्सग्रस्त रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून असे रुग्ण आढळल्यास खासगी रुग्णालयाने ०७१२-२५५२११० या क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे. 

रुग्णांच्या आक्रमक तेचे अनुभव
एड्सग्रस्तांचा शोध घेताना सर्वप्रथम त्यांच्याशी टेलिफोनवर संपर्क करण्यात आला. त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन समुपदेशन करण्यात आले.   काही रुग्ण औषधोपचाराची तयारी दाखवीत होते, तर काही जण आक्रमक होत असल्याचे अनुभव शासकीय चमूसह स्वयंसेवी संस्थांना आला आहे. 

प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीने सरकारी मोहीम आहे, म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबियांसाठी उपचार घेणे गरजेचे आहे. ज्यांना माहिती पडले, त्यांनी संपर्क करावा. 
- अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी

Web Title: Amravati 56 AIDS-ridden Rehabilitation In Stream, Awareness Campaign In The State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.