जेव्हा निकालापूर्वीच अमोल कोल्हे होतात खासदार..?  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 04:32 PM2019-05-06T16:32:23+5:302019-05-06T16:49:36+5:30

शिरूर लोकसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव - पाटील विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार श्री. संभाजीमहाराज फेम डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच रंगली.

amol kolhe MP before result..? | जेव्हा निकालापूर्वीच अमोल कोल्हे होतात खासदार..?  

जेव्हा निकालापूर्वीच अमोल कोल्हे होतात खासदार..?  

googlenewsNext

शेलपिंपळगाव : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीपूर्वीच कार्यकर्त्यांनी शिरूरचा खासदार ठरवण्याची किमया लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागणार की काय,  अशी चर्चा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
शिरूर लोकसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव - पाटील विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार श्री. संभाजीमहाराज फेम डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच रंगली. डॉ. कोल्हे हे माळी समाजाचे आहेत, खोटी दाढी - मिशा लावतात, ते माणसांचे डॉक्टर आहेत की जनावरांचे, मराठी टायगर्समधील चित्रीकरण, छत्रपती उदयनराजेमहाराज यांच्या विरुद्ध लढण्यास विचारण्यात आल्याने शिवसेना सोडली, यासह अनेक आरोपांमुळे या लढतीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. परिणामी, शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


येत्या २३ मे रोजी लोकसभेची मतमोजणी आहे. त्यानंतर निकाल कुणाच्या बाजूने कौल देणार, हे कागदोपत्री स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे चक्क एका लग्नपत्रिकेवर प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांचा (खासदार, शिरूर लोकसभा) म्हणून उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.

 

Web Title: amol kolhe MP before result..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.