हप्तेखोरीच्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी, संजय निरुपम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 06:50 PM2017-10-29T18:50:40+5:302017-10-29T18:51:35+5:30

फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे  नेतेही सहभागी असल्याचा आरोप  संजय निरुपम यांनी केला आहे. मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे मनसेचे नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आमने सामने आले आहेत.

The allegations of MNS leader Participants, Sanjay Nirupam and others involved in the hacking racket | हप्तेखोरीच्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी, संजय निरुपम यांचा आरोप

हप्तेखोरीच्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी, संजय निरुपम यांचा आरोप

googlenewsNext

मुंबई - फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे  नेतेही सहभागी असल्याचा आरोप  संजय निरुपम यांनी केला आहे. मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे मनसेचे नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आमने सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांची बाजू घेताना निरुपम यांनी हा आरोप केला आहे. 
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून प्रसारमाध्यमांशी बोलताना निरुपम म्हणाले, "फेरिवाले ही जागतिक समस्या आहे. जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मी फेरिवाल्यांना पाहिले आहे. ही फक्त मुंबईपुरती मर्यादित समस्या नाही. त्यामुळे नागरिकांनी फेरिवाल्यांऐवजी ही समस्या वाढवणाऱ्या पालिका प्रशासनावर टीका करावी. फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात मी गेली अनेक वर्षे संबंधितांशी चर्चा करत आङे. त्यांना परवाने देण्याची मागणी करत आहे. पण यासंदर्भात काहीही हालचाली होत नाही. कारण या सगळ्या रॅकेटमध्ये हप्तेखोरी आहे. ज्यामध्ये मनसेचे नेतेही सहभागी आहेत." 
मुंबईत जेथे फेरीवाले कमकुवत असतील तेथे मनसेची दादागिरी चालेल. मात्र ज्या भारात फेरीवाले वरचढ असतील तेथे मनसेला मार खावाच लागेल असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे.  तसेच मुंबईतून मनसेची दादागिरी मोडून काढण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, असेही निरुपम यांनी म्हटले आहे. 
 दरम्यान,  मालाड पोलीस ठाण्यात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केलंय. विनापरवानगी सभा घेऊन भाषण केल्यानिमित्त संजय निरुपमांविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच संजय निरुपमांनी चिथावल्यामुळेच हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  
मालाड पश्चिम येथे फेरीवाल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान संजय निरुपम बोलले होते की, 'फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल'.  

Web Title: The allegations of MNS leader Participants, Sanjay Nirupam and others involved in the hacking racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.