समुद्रावरून हवाई वाहतूक तीन महिन्यांत - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:19 AM2017-12-10T05:19:59+5:302017-12-10T05:20:03+5:30

 Air traffic in the three months - Nitin Gadkari | समुद्रावरून हवाई वाहतूक तीन महिन्यांत - नितीन गडकरी

समुद्रावरून हवाई वाहतूक तीन महिन्यांत - नितीन गडकरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात सी-प्लेनची चाचणी घेतली. या निमित्ताने गडकरींनी सांगितले की, देशाला ७,५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. १११ नद्यांचा उपयोग जल वाहतुकीसाठी होणार असल्याने आणखी २० हजार किमी जलमार्ग उपलब्ध होईल. त्यावर ४० नदी बंदरे विकसित केली जातील. या सोर्इंचा उपयोग जल हवाई वाहतुकीसाठीही होऊ शकतो.
भारतीय हवाई क्षेत्र देशांतर्गत सेवांमध्ये जगात तिसºया व आंतरराष्टÑीय सेवांमध्ये चौथ्या स्थानी आहे. यासाठी ‘उडान’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आता जल हवाई वाहतूक ही ‘उडान टप्पा दोन’ असेल, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.
‘कोडीअ‍ॅक १००’ या १४ आसनी उभयचर अर्थात, जमीन व पाणी दोन्हीवर उतरू शकणाºया विमानाद्वारे ही चाचणी घेण्यात आली. हे विमान जपानच्या सेतेउची होल्डिंग्स कंपनीचे आहे. त्यांच्याकडून स्पाइस जेटने ते भाडेतत्त्वावर घेतले. आम्ही लवकरच देशांतर्गत जल हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यास तयार आहोत. केंद्र सरकारच्या नियमांची प्रतीक्षा आहे, असे स्पाइस जेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले. सेतेउची कंपनीचे सीईओ काझुयुकी ओकाडा या वेळी उपस्थित होते.

दृश्यतेचा फटका

मुंबई शहर आणि उपनगरात सध्या दिवसभर धुलिकण आणि दवबिंदू यांचे मिश्रण असलेले ‘हेझ’आहे. त्यामुळे अंधुक असलेल्या वातावरणातील १५०० मीटरपेक्षा कमी दृश्यतेचा फटका चाचणीला बसला.
विमानाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्टÑीय विमानतळावरून उड्डाणास विलंब झाला. तोपर्यंत मान्यवरांना समुद्रात बोटीत ताटकळत बसून राहावे लागले.

राज्यात बांधणार ३० जेट्टी : जल वाहतुकीसाठी राज्यभरात ३० जेट्टी बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम मंडळाला केंद्र सरकार निधी देईल, तसेच ठाणे-विरार वाहतुकीसाठीही ५०० कोटी रुपये निधी दिला जाईल, असे गडकरींनी सांगितले.

Web Title:  Air traffic in the three months - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.