अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाचा १५ जानेवारीला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:57 PM2018-01-01T19:57:25+5:302018-01-01T20:02:58+5:30

Ahmednagar,district,sonai,three,murder,case,nashik,court,result | अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाचा १५ जानेवारीला निकाल

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाचा १५ जानेवारीला निकाल

googlenewsNext
ठळक मुद्दे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांड १५ जानेवारीला खटल्याचा निकाल देण्याची शक्यता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी (दि़१) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे अर्धा तास आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला उत्तर दिले़ या खटल्यात ५३ साक्षीदार तपासण्यात आले असून १५ जानेवारी ही पुढील तारीख ठेवण्यात आली आहे़ दरम्यान, येत्या १५ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱआऱवैष्णव या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता आहे़


नेवासा फाटा येथील घाडगे - पाटील महाविद्यालयातील एका मुलीचे मेहतर समाजाच्या मुलावर प्रेम होते. या प्रेमप्रकरणातून जानेवारी २०१३ मध्ये सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे संदीप राज धनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६), सचिन घारू (वय २३) या तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे तिघेही नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय अडकित्त्याने तोडून कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.

या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुºहे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे़ नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्यावेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिककत्यार्चे मुद्दे, म्हणणे ग्राह्य धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिक सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश वैष्णव यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू असून आतापर्यंत ५३ साक्षीदार तपासण्यात आले आहेत़ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सोमवारी आरोपींच्या युक्तिवादाला उत्तर दिल्यानंतर या खटल्याची पुढील तारीख १५ जानेवारी ठेवण्यात आली असून या दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे़

Web Title: Ahmednagar,district,sonai,three,murder,case,nashik,court,result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.