अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय पुन्हा ६५ , राज्य सरकारची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:35 AM2018-03-20T00:35:07+5:302018-03-20T00:35:07+5:30

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी मागे घेतला. त्यामुळे वयाची साठी उलटलेल्या सुमारे १३ हजार अंगणवाडी सेविकांची नोकरी शाबूत राहणार आहे.

Age of retirement age of 65 years for Anganwadi Seviks again, state government withdrawal | अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय पुन्हा ६५ , राज्य सरकारची माघार

अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय पुन्हा ६५ , राज्य सरकारची माघार

Next

मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी मागे घेतला. त्यामुळे वयाची साठी उलटलेल्या सुमारे १३ हजार अंगणवाडी सेविकांची नोकरी शाबूत राहणार आहे.
निवृत्तीचे वय कमी करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारने रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली होती. त्याची गंभीर दखल घेत अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय पुन्हा ६५ करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे
यांनी जाहीर केले. अर्थसंकल्पावरील महिला व बालविकास विभागावरील अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला मुंडे यांनी उत्तर दिले.

Web Title: Age of retirement age of 65 years for Anganwadi Seviks again, state government withdrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.