राज्यात चार महिन्यात 5 लाख विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई; 8 कोटींची वसूली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 08:24 PM2019-05-27T20:24:33+5:302019-05-27T20:26:14+5:30

विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचे प्रमाण वाढले हे स्वागतार्ह असले तरी हेल्मेटचा वापर करण्याबाबत लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.

Action on 5 million bikers in four months who not use Helmet, Recovery of 8 crores | राज्यात चार महिन्यात 5 लाख विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई; 8 कोटींची वसूली

राज्यात चार महिन्यात 5 लाख विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई; 8 कोटींची वसूली

googlenewsNext

मुंबई - राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या 3 लाख 39 हजार 982 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई शहरात या कालावधीत 1 लाख 41 हजार 730 मोटारसायकल चालकांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती सह्याद्री राज्य  अतिथीगृह येथे आज झालेल्या रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परिवहन आयुक्तालयामार्फत देण्यात आली आहे. तसेच राज्यात या प्रकरणांमध्ये 8 कोटी 32 लाख रुपयांची दंडवसूली करण्यात आली आहे. 

यासंदर्भात सूचना देताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचे प्रमाण वाढले हे स्वागतार्ह असले तरी हेल्मेटचा वापर करण्याबाबत लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. शासनाने कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती केली नसून हेल्मेट वापराच्या नियमाची फक्त अंमलबजावणी केली जात आहे. हेल्मेटचा वापर करणे हे वाहनचालकांच्या जीवितरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.

मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. बैठकीस परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.  दर 5 वर्षांनी वाहनचालकांना 8 दिवसांचे वाहतुकीचे अद्ययावत प्रशिक्षण देणे तसेच वाहतुकीविषयी विविध प्रश्नांवर संशोधन करणे आदींसाठी राज्य शासनाची स्वतंत्र ‘वाहन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत.  

टायर तपासणीची यंत्रणा सुरु करा
मुंबई ते नागपूर दरम्यान होत असलेल्या समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमवबजावणी रस्ते बांधकामाच्या वेळीच होणे गरजेचे आहे. या महामार्गासाठी जी अधिकची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्यास अनुसरुन आपल्या वाहनांचे आणि त्यांच्या टायर्सचे डिजाईन आहे का याचा विचार व्हावा, अशी सूचना यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. यासाठी वाहन उत्पादक आणि टायर उत्पादक कंपन्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा करावी. राज्यात बरेच अपघात हे टायर फुटून किंवा ते पंक्चर झाल्याने होतात. त्यामुळे टायर तपासणीची काही यंत्रणा आपल्याकडे सुरु करता येईल का याचाही अभ्यास करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिली. निकामी किंवा गुळगुळीत टायरसह प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सूचीत केले.

Web Title: Action on 5 million bikers in four months who not use Helmet, Recovery of 8 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.