Accidental death of mother with two girls in Mumbai | मुंबईच्या दोन मुलींसह मातेचा अपघाती मृत्यू  

निपाणी (जि. बेळगाव) - कार झाडावर आदळून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात मुुंबईच्या गुप्ता कुटुंबातील दोन मुलींसह माता ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी पहाटे पुणे-बंगलोर महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटाच्या पायथ्याशी हा अपघात झाला.
सावित्री गुलाबचंद गुप्ता (४१), शोभा गुलाबचंद गुप्ता (२५), आरती गुलाबचंद गुप्ता (२१) अशी मृतांची नावे आहेत. तर नीलेश गुलाबचंद गुप्ता (४१), रवी मोहनलाल गुप्ता (२९) आणि चालक सूर्या साई (२२) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. मुंबई येथील गुप्ता कुटुंबीय पर्यटनासाठी स्विफ्ट कारने गोव्याला गेले होते. सोमवारी मुंबईला परत जाण्यासाठी ते गोव्याहून निघाले. मंगळवारी पहाटे ३.३०च्या सुमारास तवंदी घाटाच्या पायथ्याशी असणा-या चव्हाण मळ्याजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला. सेवा रस्त्याच्या मधल्या पट्ट्यातील झाडांवर कार वेगाने आदळली़