म्हाडाच्या ८१९ घरांसाठी ७८ हजार ६७४ अर्ज, ५३ हजार ११९ अर्जदारांनी केला अनामत रकमेचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, October 26, 2017 1:47am

मुंबई : वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, ८१९ घरांसाठी अखेरपर्यंत ७८ हजार ६७४ अर्ज दाखल झाले आहेत.

मुंबई : वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, ८१९ घरांसाठी अखेरपर्यंत ७८ हजार ६७४ अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांपैकी ५३ हजार ११९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करण्याचा २३ आॅक्टोबर हा अखेरचा दिवस होता. अखेरच्या मुदतीपर्यंत ६६ हजार ७८० जणांनी म्हाडाच्या घरासाठी संकेतस्थळावर नोंद केली. अर्ज सादर करण्यासाठी २४ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत अखेरचा दिवस होता. या दिवसापर्यंत ७८ हजार ६७४ अर्ज दाखल झाले. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरणा करण्यास चलननिर्मिती २५ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार होती. आॅनलाइन पेमेंट स्वीकृती २६ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार आहे. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरणा २६ आॅक्टोबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.

संबंधित

म्हाडा लॉटरीत ३६ हजार अर्ज पात्र
विकेन्डला धमाल-मस्ती करण्यासाठी खास वन-डे डेस्टिनेशन!
सर्वांत कमी वजनाच्या अर्भकाला जीवदान
मुंबई: ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबले; कारच्या धडकेत ५ जखमी
मुंबईत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळले, दरोड्याच्या उद्देशाने हत्येचा संशय

महाराष्ट्र कडून आणखी

मालवणात ढगफुटी, ओढे-नद्यांना पूर, वाहतूक ठप्प
पारदर्शक प्लॅस्टिक वापराला १५ आॅगस्टपर्यंत मुभा?
शिवसेनेच्या आमदारांत तीव्र खदखद, स्वतंत्रपणे लढण्यास विरोध
महाबँकेच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेंना अशी केली मदत
MLC ELECTION : पदवीधर आणि शिक्षकांचा आमदार होण्यासाठी दहावी पासही रिंगणात, तसेच गंभीर गुन्ह्यांमधील आरोपीही

आणखी वाचा