राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 09:58 PM2018-08-14T21:58:44+5:302018-08-14T22:01:04+5:30

तीन अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं गौरव होणार

51 police medals announced to state police officials and employees on the eve of independence day | राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर 

राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर 

Next

नवी दिल्ली: राज्यातील 51 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील आठ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. तर तीन कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं तयार केलेल्या यादीत देशभरातील 942 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील एकूण 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पोलीस पदकांनी सन्मान करण्यात येणार आहे. राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांनाही पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये मुंबईतील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेशाम पांडे आणि नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांचा समावेश आहे. 

राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले अधिकारी
शिवाजी तुळशीराम बोडखे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
बाळू प्रभाकर भवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नियंत्रण कक्ष, नाशिक शहर
दयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलीस निरीक्षक, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर

शौर्य पदक जाहीर झालेले अधिकारी-कर्मचारी
शितलकुमार अनिक कुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक
हर्षद बबन काळे, पोलीस उपनिरीक्षक
प्रभाकर रंगाजी मडावी, पोलीस कॉन्स्टेबल
महेश दत्तू जाकेवार, पोलीस कॉन्स्टेबल
अजितकुमार भगवान पाटील, पोलीस उपनिरीक्षक
टिकाराम संपतराय काटेंगे, नायब पोलीस कॉन्स्टेबल
राजेंद्र श्रीराम तडमी, पोलीस कॉन्स्टेबलॉ
सोमनाथ श्रीमंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल
 

Web Title: 51 police medals announced to state police officials and employees on the eve of independence day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.