नाशिकच्या बिल्डिंग मटेरीयल सप्लायर्सची कल्याणच्या संशयितांकडून ४६ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 04:11 PM2017-11-18T16:11:22+5:302017-11-18T16:16:39+5:30

46 lakh cheating of welfare suspects of building material suppliers of Nashik | नाशिकच्या बिल्डिंग मटेरीयल सप्लायर्सची कल्याणच्या संशयितांकडून ४६ लाखांची फसवणूक

नाशिकच्या बिल्डिंग मटेरीयल सप्लायर्सची कल्याणच्या संशयितांकडून ४६ लाखांची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्दे कल्याणमधील संशयित पैसे न देता बांधकाम साहित्याची खरेदी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरीयल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ रिषभ रमेश दुबे, दिनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अपार्टमेंट, मोहाने रोड शहर, ताक़ल्याण, जि़ठाणे) अशी फसवणूकीतील संशयितांची नावे असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मानगर येथील कपिल शरद वाघ (राफ़्लॅट नंबर ७, हरी मंगल अपार्टमेंट) यांचे मखमलाबाद नाक्यावरील गोल्ड क्वाईन अपार्टमेंटमध्ये बिल्डिंग मटेरीयल सप्लायर्सचे दुकान आहे़ २७ एप्रिल २०१६ ते १९ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत कल्याणमधील संशयित दुबे व पांडे यांनी वाघ यांच्याकडून बांधकामासाठी लागणाºया फ्लाय अ‍ॅशपासूननिर्मित विटा अर्थात एएसी ब्लॉक जॉईटिंग अधेसिव (मोआर्टर) व इतर साहित्य विकत घेतले़ सुरुवातीस बांधकामाचे साहित्य विकत घेतांना थोड्या-थोड्या रकमा देऊन संशयितांनी वाघ यांचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर बºयाच वेळा पैसे न देता विश्वासावर ४५ लाख ८५ हजार ९४६ रुपयांचा माल खरेदी केला़
मटेरीयल सप्लायर वाघ यांनी संशयितांकडे मालाचे पैसे मागीतले असता ते टाळाटाळ करू लागले़ अखेर पैसे मिळत नसल्याने वाघ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पांडे व दुबे यांच्याविरोधात फसवणूकीची फिर्याद दिली़

Web Title: 46 lakh cheating of welfare suspects of building material suppliers of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.