मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौरऊर्जेद्वारे वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 05:50 AM2018-12-10T05:50:44+5:302018-12-10T05:51:06+5:30

११ केव्ही सौरऊर्जेचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित

45 lakh farmers in the state will get electricity by solar energy | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौरऊर्जेद्वारे वीज

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौरऊर्जेद्वारे वीज

Next

मुंबई : शेतकºयांची वाढती विजेची मागणी लक्षात घेता, राज्यातील ४५ लाख शेतकºयांना आगामी काळात सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत ११ केव्ही सौरऊर्जा शेतकºयांना देण्यात येणार आहे.

राज्यात या योजनेंतर्गत चार प्रकल्प सुरू झाले असून, त्याचा फायदा शेतकºयांना मिळत आहे. याशिवाय रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून शासकीय कार्यालये, शाळा, पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, घरगुती वापरासाठी लागणारी वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्मिती करणे सुरू झाले आहे.

याशिवाय एक हजार मेगावॉटचे ऊर्जा संवर्धन धोरण, ग्रामविद्युत व्यवस्थापक, दीनदयाल योजना, आयपीडीएस-२, उद्योगांना वीजदरात सवलत, दलित वस्त्यांना १०० टक्के विद्युतीकरण, आॅनलाइन वीजबिल प्रक्रिया, इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेइकल, एमओडी असे अनेक ग्राहकोपयोगी निर्णय ऊर्जा विभागाने घेतले आहेत.

पाच लाख कृषिपंपांना कनेक्शन
एक किंवा दोन शेतकºयांसाठी एक ट्रान्सफॉर्मर, याप्रमाणे वीजपुरवठा केला जाईल. त्यामुळे वीजचोरीवर आळा बसेल. 
सौरऊर्जेमुळे चार वर्षांत महानिर्मितीची सुमारे ३,३६० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमतावाढ झाली आहे.
ऊर्जा विभागाने सुमारे एक हजार कोटींची बचत चार वर्षांत केली आहे.

आतापर्यंत पाच लाख कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे कनेक्शन देण्यात आले आहे.
उर्वरित शेतकºयांच्या कृषिपंपांना एचव्हीडीएस योजनेंतर्गत कनेक्शन दिले जात आहे.

Web Title: 45 lakh farmers in the state will get electricity by solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी