राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार

By अतुल कुलकर्णी on Fri, March 09, 2018 4:43am

राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

- अतुल कुलकर्णी मुंबई - राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. वित्तमंत्री मुनगंटीवार यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. बजेटवर अंतिम हात फिरवल्यानंतर ते लोकमतशी बोलत होते. यावर्षीचा अर्थसंकल्प हा शेतकरी, उद्योग, सामाजिक न्यायाच्या विविध योजनांना न्याय देणारा आणि राज्यात रोजगार वाढविणारा असेल असेही ते म्हणाले. राज्याने ज्यादा व्याज दराने कर्ज घ्यायचे, तो पैसा विविध विभागांना त्यांच्या योजनांसाठी द्यायचा आणि त्या विभागांनी तो खर्च न करता कमी व्याज दराने पुन्हा बँकांमध्ये ठेवीच्या रुपाने ठेवतात. परिणामी राज्याचे नुकसान होते असे सांगून अर्थमंत्री म्हणाले, ही सगळी रक्कम मुख्य बजेट मध्ये आणली जाईल व जशी गरज असेल तशी ती विविध विभागांना दिली जाईल.आजपर्यंत ६० हजार कोटींची रक्कम पीएलए खात्यात निघाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यावर मोठे कर्ज आहे. व्याजासाठी किती रुपये द्यावे लागतात? राज्यावर जरी मोठे कर्ज असले आणि व्याजापोटी दरवर्षी ३० हजार कोटी रुपये द्यावे लागत असले तरी कर्जाचे हे प्रमाण उत्पनाशी सांगड घालूनच केलेले आहे. शेवटी जनतेच्या भल्यासाठी, त्यांच्या पायाभूत सोयीसाठी आणि नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी जर कर्ज काढले तर त्यात चुकीचे काहीच नाही. २००७-०८ साली कर्जाचे प्रमाण २५.५ होते जे आज १६.६ आहे. पण गेल्या २० वर्षांत जेवढ्या पुरवणी मागण्या झाल्या नाहीत, तेवढ्या या वर्षात झाल्या. नियोजनाच्या अभावातून हे झाले का? - पुरवणी मागण्या या विक्रमी होत्या हे मान्य आहे. ते तर्कसंगत वाटणारही नाही. पण गेल्यावर्षी पासून आपण प्लॅन व नॉनप्लॅन असे बजेट नीति आयोगाच्या शिफारशीमुळे एकत्र केले. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या एकत्रीत योजनांना द्यावा लागणारा राज्याचा हिस्सा त्यावेळी निश्चित झाला नव्हता. तो जसा जसा होत गेला तशा पुरवणी मागण्या कराव्या लागल्या. शिवाय कर्जमाफी, गारपीट यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी लागली. पण यामुळे विविध विभागांच्या निधीला ३० टक्के कट लावला गेला? ३० टक्के नाही, १० ते २० टक्के कट लावला गेला. हे आमच्याच काळात नाही तर आधीपासून हे होत आले आहे. परिस्थितीनुरुप ते करावेही लागते. पण हे करताना डीपीडीसी, आमदार निधी, कुपोषण, आरोग्य या विभागांना कट लावला नव्हता.  बजेटमधून जनतेला काय मिळणार? शेतकरी, तरुण बरोेजगार आणि सामाजिक न्यायासाठीचे हा अर्थसंकल्प असेल. आपला तरुण राज्यातच नाही तर रेल्वे, बँका, मिल्ट्री या माध्यमातून देशभरात रोजगारासाठी जावा यासाठीचे वातावरण देणारा हा अर्थसंकल्प असेल. कोणत्या विभागाकडे किती डिपॉझिट ? ही आकडेवारी मोजक्या विभागांची आहे. विविध जिल्हापरिषदा 17000 एमएमआरडीए 16500 सिडको 8000 बांधकाम बोर्ड 6000 जलसंपदा 5500 एमआयडीसी 5500

संबंधित

आजपासून प्लास्टिक वापराल?, तर 5 हजार रुपये भरावा लागणार दंड
स्वबळावरच जिंकणार, शिवसेना देशपातळीवर नेणार, आदित्य ठाकरेंचा निर्धार  
मुख्यमंत्री परतताच विस्ताराची चर्चा, अधिवेशनापूर्वी विस्तार करण्यात अडचणी
राज्यातील वृक्षलागवड मोहीम बनली लोकचळवळ
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाईन प्रमाणपत्र 

महाराष्ट्र कडून आणखी

International Yoga Day 2018 : विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करायचा कुठे?
International Yoga Day 2018 : नियमित ‘योग’ बदलेल मानवाचे आयुष्य, जीवनातील समस्या सोडविण्याची गुरुकिल्ली
International Yoga Day 2018 : ...अन् ३ हजार कैदी झाले योगमय
International Yoga Day 2018 : ७९ वर्षांचे गृहस्थ शिकवितात योग
International Yoga Day 2018 : मनपा शाळेचे सव्वा लाख विद्यार्थी करणार ‘योग’

आणखी वाचा