ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 17 - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त येथील जयस्तंभ चौकात ३८७ ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जयस्तंभ चौक परिसर सर्वत्र ढोल ताशांचा निनादात दणाणून गेला होता.
येथे जमलेल्या शिवभक्तांनी शिवघोषणा देत ढोल तासे वादकांचा उत्साह वाढविला.
पांढरे शर्ट व भगव्या फेट्यांमध्ये १७ फेबु्रवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान ढोलवादक एकत्र जमले होते. ५.३० वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी  पुष्पगुच्छ अर्पण करून ढोल तासे वाजविण्याचा कार्यक्रम सुूरू करण्यात आला. तब्बल अर्धा तास हा परिसर आवाजाने दणाणून गेला होता. शहरातील शेकडो शिवभक्तांनी हा उपक्रम पाहण्याकरिता गर्दी केली होती. यानंतर इतिहास संशोधक प्रा. अशोक राणा यांच्या व्याख्याणाला सुरूवात झाली.