सिंधुदुर्गात ३६ कोटींची कर्जमाफी, १७ हजार, ८६३ शेतक-यांना मिळाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 07:18 PM2017-12-12T19:18:09+5:302017-12-12T19:18:30+5:30

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ हजार ८६३ शेतक-यांना ३५ कोटी ९२ लाख ४0 हजार २ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

36 crore debt relief in Sindhudurg, 17 thousand 863 farmers benefited from this | सिंधुदुर्गात ३६ कोटींची कर्जमाफी, १७ हजार, ८६३ शेतक-यांना मिळाला लाभ

सिंधुदुर्गात ३६ कोटींची कर्जमाफी, १७ हजार, ८६३ शेतक-यांना मिळाला लाभ

Next

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ हजार ८६३ शेतक-यांना ३५ कोटी ९२ लाख ४0 हजार २ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील १५ हजार ४३५ लाभार्थींना २६ कोटी २५ लाख १७ हजार ७८७ रुपये रकमेचा लाभ तर विविध बँकामधील २४२८ लाभार्थ्यांना ९ कोटी ६७ लाख २२ हजार २१५ रुपये रकमेचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मेधा वाके यांनी दिली.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतक-यांना त्यांचे थकीत खाते पूर्ववत करण्यासाठी व ज्या शेतक-यांनी आपले खाते नियमित ठेवले आहे. अशा शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून मदत केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी चालू असून, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ७ डिसेंबर रोजीपर्यंत प्राप्त झालेल्या ग्रीन लिस्टनुसार ४ हजार १८ थकबाकीदार शेतक-यांना ११ कोटी ४३ लाख १५ हजार ७४२ इतकी रक्कम तर ११ हजार ४१७ शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत १४ कोटी ८२ लाख २ हजार ४५ अशा एकूण १५ हजार ४३५ लाभार्थ्यांना २६ कोटी २५ लाख १७ हजार ७८७ इतक्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

बँक आॅफ इंडिया कर्ज माफीस पात्र लाभार्थी ७४६ रक्कम ३ कोटी ४२ लाख १५ हजार रुपये, प्रोत्साहनपर लाभार्थी ८४२ रक्कम २ कोटी १६ लाख ४५ हजार, बँक आॅफ महाराष्ट्र ४६ लाभार्थी रक्कम २९ लाख २८ हजार रुपये, सेन्ट्रल बँक आॅफ इंडिया १८ लाभार्थी रक्कम ९ लाख १ हजार रुपये, कॉर्पोरेशन बँक प्रोत्साहनपर लाभाचे लाभार्थी ३७ रक्कम ४ लाख १५ हजार रुपये. स्टेट बँक आॅफ इंडिया ५९ लाभार्थी रक्कम ३२ लाख ९८ हजार ७३0 रुपये, देना बँक प्रोत्साहनपर २६ लाभार्थी रक्कम ८ लाख ४५ हजार रुपये, सिंडीकेट बँक १९ लाभार्थी रक्कम ७ लाख ७१ हजार रुपये व प्रोत्साहनपर लाभार्थी ७ रक्कम ९५ हजार रुपये. युको बँक प्रोत्साहनपर ८ लाभार्थी रक्कम १ लाख ४५ हजार रुपये, युनिअन बँक आॅफ इंडिया कर्जमाफीस पात्र लाभार्थी ४८ रक्कम १३ लाख ६ हजार रुपये व प्रोत्साहनपर लाभार्थी २१0 रक्कम ४७ लाख ३२ हजार रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँक कर्जमाफीस पात्र लाभार्थी ३६0 रक्कम २ कोटी ४९ लाख ८0 हजार ४८५ रुपये व प्रोत्साहनपर ३२ लाभार्थी रक्कम ४ लाख ४५ हजार.

७ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार मुद्दल व व्याजासह १ लाख ५0 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एक वेळ समझोता योजना (ओटीएस) जाहीर करण्यात आली आहे. पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची १ लाख ५0 हजारांपेक्षा जास्त असलेली संपूर्ण रक्कम ३१ मार्च २0१८ पर्यंत बँकेत जमा केल्यावर शासनातर्फे १ लाख ५0 हजार रुपये लाभांची रक्कम शेतक-यांना संबंधित बँकामार्फत अदा करण्यात येणार आहे. अशी माहिती सहकारी उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आली.

आतापर्यंत राज्यात ४१ लाख शेतक-यांना लाभ
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतक-यांना कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकाकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ७७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननी अंतर्गत डुप्लीकेशन झालेले खाते दूर करुन ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकाकडे सुमारे १९ हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरीत करण्यात आला आहे. शेवटच्या पात्र शेतक-याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली आहे.

कर्जमाफीचा लाभ घ्या
सदरच्या वाढीव मुदतीचा लाभ घ्या. तसेच एक वेळ समझोता योजने अंतर्गत येणा-या शेतक-यांनी आपल्या हिश्श्यांची रक्कम लवकरात लवकर भरून १ लाख ५0 हजार रुपया पर्यंतचा कर्जमाफीचा लाभ घ्यावा
- मेधा वाके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग

Web Title: 36 crore debt relief in Sindhudurg, 17 thousand 863 farmers benefited from this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.