राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:11 PM2018-05-18T12:11:26+5:302018-05-18T12:11:26+5:30

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून  गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास  ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. या वर्षी जवळपास ६००० गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २०  हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून याचे श्रेय त्यांनी जनसहभागाला दिले.

20 thousand villages in the state will be drought-free: Devendra Fadnavis | राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील : देवेंद्र फडणवीस

राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील : देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्दे७५ तालुक्यातील हजारो गावात ग्रामस्थांनी केले श्रमदानदुष्काळाशी दोन हात केले, याबद्दल जनसहभागाचे अभिनंदन

सांगली :  राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून  गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास  ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. या वर्षी जवळपास ६००० गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २०  हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून याचे श्रेय त्यांनी जनसहभागाला दिले.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आवंढी आणि बागलवाडी येथे पाणी फौंडेशन अंतर्गत जलसंधारण कामांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.

एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून ती जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली, तिला अमीर खान यांच्या वॉटर कपची साथ मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला. याच मंत्राच्या आधारावर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून, एकच ध्यास घेऊन काम करतायत, कसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून ती जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली, तिला अमीर खान यांच्या वॉटर कपची साथ मिळाली.

या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला. याच मंत्राच्या आधारावर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून, एकच ध्यास घेऊन काम करतायत, कसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दुष्काळाचे आव्हान स्वीकारून, दुष्काळाशी दोन हात केले व त्याला पराभूत केले, याबद्दल जनसहभागाचे अभिनंदन केले. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले आहे, असे ते म्हणाले.

बागलवाडीत या स्पर्धेचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावात असलेल्या महिलाराजला दिले. तरुण आणि माता भगिनींनी प्रामाणिकपणे, सचोटीने वेळेच्या आत काम केल्याबद्दल अभिनंदन केले.

फडणवीस म्हणाले की,  दोन ते तीन  वर्षांपूर्वी जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. मात्र जल संधारणाच्या कामामुळे हा तालुका हळूहळू टँकरमुक्त होऊ लागला आहे. समाजाने मनावर घेतले तर काय परिवर्तन होऊ शकते, याचा प्रत्यय बागलवाडी ग्रामस्थांनी मला दिला.

या माध्यमातून प्रत्येकाचा धर्म, जात, पक्ष, गट हा पाणी झाला आहे. पाण्याच्या या कामामुळे लोक एकत्र येऊन गाव बदलायचे काम करत आहेत, याचे श्रेय वॉटर कप स्पर्धेला आहे.

त्यांच्यासोबत पाणी फौंडेशनचे अविनाश पोळ यांच्यासह आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, प्रभारी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी डॉ. खोत, उपविभागीय पोलिस अधिकारी वाकुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल गावडे, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी चिल्लळ, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गुणाले आदी उपस्थित होते.

फडणवीस यांचे आवंढी येथे उत्स्फूर्त स्वागत

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जत तालुक्यातील आवंढी येथे हेलिपॅडवर मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, तहसिलदार अभिजीत पाटील आदि उपस्थित होते.

बागलवाडी ग्रामस्थांचे कौतुक

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, बागलवाडी गावाला बागांचे गाव करण्यासाठी प्रयत्न बागलवाडी ग्रामस्थांचे कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलोय. तीन ते साडेतीन  वर्षांपूर्वी राज्यात  ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण, दुष्काळी होता. कितीही मोठी धरणं बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणं आवश्यक आहेतच, पण त्याच बरोबर विकेंद्रित पद्धतीने पाणलोटाचे स्रोत निर्माण करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली.

 

Web Title: 20 thousand villages in the state will be drought-free: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.