२० लाख क्विंटल तूर : तूर भरडाईच्या निविदांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:47 AM2018-03-09T02:47:33+5:302018-03-09T02:47:33+5:30

शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क्षमता नसल्याने या संस्थांमार्फत तूर भरडाईचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे.

 20 lakh quintals of tur.: Tire encroachment arrangements | २० लाख क्विंटल तूर : तूर भरडाईच्या निविदांचा घोळ

२० लाख क्विंटल तूर : तूर भरडाईच्या निविदांचा घोळ

Next

- राजेश निस्तान
मुंबई - शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क्षमता नसल्याने या संस्थांमार्फत तूर भरडाईचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. पर्यायाने २० लाख क्ंिवटलपेक्षा अधिक तूर शासकीय गोदामांमध्ये पडून आहे.
शासनाने २५ लाख क्ंिवटल तुरीची खरेदी केली. मात्र अनेक महिने पणन मंत्री, सचिव व मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी लक्ष न दिल्याने ही तूर पडून राहिली. अखेर या तुरीची डाळ बनवून ती शासकीय योजनांमध्ये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने तूर भरडाईची निविदा काढली. त्यात १३ दालमिलने सहभाग घेतला होता. मात्र मर्जीतील व्यापाºयांना काम देता यावे म्हणून तांत्रिक कारण दर्शवून पुन्हा निविदा काढल्या गेल्या. मुंबईतील राठी यांच्या सप्तश्रृंगी आणि गुप्ता यांच्या ईटीजी कंपनीला भरडाईचे कंत्राट दिले गेले. वास्तविक या दोनही कंपन्यांची २० लाख क्ंिवटल तूर भरडाईची क्षमताच नसल्याचे सांगितले जाते. प्रति क्ंिवटल तुरीमागे ६७.७५ टक्के उतारा (तूरडाळ) देण्याच्या अटीवर कंत्राट दिले गेले. मात्र या संस्थांच्या तूर भरडाईची गती प्रचंड मंद आहे. आतापर्यंत केवळ २ लाख क्ंिवटल तुरीची भरडाई झाली आहे. तर दुसरीकडे २० लाख क्ंिवटल तूर अद्यापही गोदामात पडून आहे. नव्याने खरेदी होत असलेली तूर साठवावी कुठे याचा पेच पणन व सहकार खात्यापुढे कायम आहे. वेळेत भरडाई होत नसतानाही त्या दोन कंत्राटदारांवर पणन खात्याने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.

निकृष्ट डाळीचा पुरवठा

शासकीय गोदामातील तुरीपासून बनविलेली दर्जेदार डाळ जादा किमतीत बाजारात विकली जात असून निकृष्ट दर्जाची डाळ शासनाला दिली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. हीच निकृष्ट डाळ पोषण आहारातून लहान मुलांच्या पोटात जात आहे. सीआयडी चौकशी झाल्यास यातील मोठे घबाड उघड होईल.

दुस-यांदा निविदा
आतापर्यंत सव्वादोन लाख क्ंिवटल तुरीची भरडाई झाली आहे. मागणीनुसार ती करून दिली जात आहे. त्यासाठी वेळेचे बंधन नाही. भरडाईचे काम दोन महिन्यांपासूनच सुरू झाले आहे. १३ संस्था सक्षम नसल्याने दुसºयांदा निविदा काढावी लागली.
- अनिल देशमुख, सरव्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशन, मुंबई.

खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर परत!
पिंजर (अकोला) : नाफेडच्या पिंजर येथील केंद्रावर खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर, वेअर हाउसने निकृष्ट ठरवत परत केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या केंद्रावर आठ हजार क्ंिवटल तुरीची खरेदी झाली होती. तूर परत आल्याने शेतकºयांचे चुकारेही लांबणीवर पडले आहेत. तुरीचा दर्जा उत्तम असतानाही परत केल्याने शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

Web Title:  20 lakh quintals of tur.: Tire encroachment arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.