लोकमत न्यूज नेटवर्क
राजरत्न सिरसाट
अकोला: राज्यातील एकूण खासगी कृषी महाविद्यालयांपैकी जवळपास २0 च्यावर महाविद्यालयाचा दर्जा घसरलेला असून, ही महाविद्यालये तपासणीत ह्यडह्ण श्रेणीत आढळली आहेत. या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनांनी आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश बंदची कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) राज्यातील खासगी कृषी महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी त्रयस्त समिती नेमली असून, या समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी आहेत. या समितीने तपासणीचे काम सुरू केले आहे. राज्यातील जी २0 कृषी महाविद्यालये ह्यडह्ण श्रेणीत आढळली आहेत, या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वसतिगृह तसेच वाचनालय, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी लागणारे जमीन फॉर्म नसल्याचे समोर आले आहे.डॉ.एस.एन. पुरी समिती या सर्व महाविद्यालयांची पुन्हा तपासणी करणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ द्यायचा की नाही, याबाबत एमसीईएआरला शिफारस करणार आहे.
या संदर्भात १७ मे रोजी खासगी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक एमसीईएआरने पुण्याला आयोजित केली होती. या बैठकीला जवळपास सर्वंच प्राचार्यांची उपस्थिती होती. येथे मुख्यत्वे खासगी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सुविधांच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. जर पुढे मान्यता हवी असल्यास महाविद्यालयांना विद्यार्थ्यांला लागणार्‍या सुविधांची पूर्तता करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले.
शेकडो विद्यार्थी या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. त्यातील अनुसूचित जाती, जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन शुल्क देतो. असे असूनही महाविद्यालये विद्यार्थ्यांना सुविधा देत नसतील तर ते बंद करावीच लागतील, अशी भूमिकेपर्यंंत एमसीईएआर पोहोचले आहे.

- राज्यातील २0 च्यावर खासगी कृषी महाविद्यालये ह्यडह्ण श्रेणीत आढळल्याने त्या महाविद्यालयासह सर्वच महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल; पण ह्यडह्ण वर्गातील महाविद्यालयांनी सुधारणा न केल्यास विद्यार्थी प्रवेश बंद केल्या जाईल.
डॉ. राम खर्चे,
उपाध्यक्ष, एमसीईएआर, पुणे.