17 people killed in four accidents in the state | राज्यात चार अपघातांमध्ये १७ जण ठार

नाशिक/नंदुरबार : राज्यात गुरुवारी चार अपघातांत १७ जण ठार झाले. सटाणा मालेगाव रस्त्यावर सकाळी रिक्षा व कंटेनरची टक्कर झाली. त्यात रिक्षाचालक व सहा खेळणी विक्रेत्यांवर काळाने घाला घातला. नंदुरबारला मिनीट्रक-रिक्षाची टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाच प्रवासी ठार झाले. जळगाव जिल्ह्यात दुचाकींच्या टकरीत दोघांचा मृत्यू झाला. सटाण्यातील सात जण मंगळवारी मुंबईला गेले होते. बुधवारी पहाटे ते मालेगावला परतत असताना हा अपघात झाला.
>गोंदियात ३, नंदूरबारमध्ये ५ ठार
गोंदियात भरधाव मारुती व्हॅनने दुचाकीला दिलेल्या टकरीत एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले. दुस-या घटनेत नंदुरबारमधील शहादा येथे मिनीट्रक- रिक्षाची टक्कर होऊन चार जागीच ठार झाले, एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला तर १३ गंभीर जखमी झाले.