राज्यातील १ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार दूध भूकटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 07:32 PM2018-09-18T19:32:24+5:302018-09-18T19:44:07+5:30

राज्य शासनातर्फे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश करण्यात आला.

1 crore 10 lakh students in the state will get milk powder | राज्यातील १ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार दूध भूकटी

राज्यातील १ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार दूध भूकटी

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या दिवाळीनंतर विद्यार्थ्यांच्या हातात दूध भूकटीची पाकिटे मिळण्याची शक्यता शालेय शिक्षण विभागातर्फे चार दिवसांपूर्वी दूध भूकटीची निविदा विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात आठवड्यातून ३ दिवस त्याचा समावेश करणे अपेक्षित

पुणे:  राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ कोटी १० लाख १२ हजार ५४८ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दूध भूकटीचे वाटप केले जाणार आहे. शिक्षण विभागातर्फे यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या दिवाळीनंतर विद्यार्थ्यांच्या हातात दूध भूकटीची पाकिटे मिळण्याची शक्यता आहे.
राज्य शासनातर्फे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश करण्यात आला.त्यामुळे खिचडी व पुरक आहाराबरोबरच विद्यार्थ्यांना दूध भूकटीही मिळणार आहे.राज्यात शालेय पोषण आहार योजनेचा सर्वाधिक लाभ घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात असून सिधूदूर्ग खलोखाल वर्धा जिल्ह्यात सर्वात कमी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते.खिचडी तयार करून विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. दिवसेंदिवस शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडे शालाबाह्य कामे वाढत आहेत.त्यात आता विद्यार्थ्यांना दूध भूकटीचे वाटप करण्याचे काम शाळांना करावे लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे चार दिवसांपूर्वी दूध भूकटीची निविदा काढण्यात आली असून येत्या ८ आॅक्टोबरपर्यंत इच्छुकांकडून निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.मात्र,केवळ महाराष्ट्रात निर्माण केल्या जाणा-या दूध भूकटीचाच समावेश शालेय पोषण आहारात करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना एका महिन्याला एक २०० ग्रॅम वजनाचे दूध भूकटीचे पाकिट दिले जाणार आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात आठवड्यातून ३ दिवस त्याचा समावेश करणे अपेक्षित आहे.येत्या आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी निविदा पक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. निवड झालेल्या दूध भूकटी उत्पादक किंवा वितरकाला प्रत्येक शाळेत दूध भूकटीची पाकिटे द्यावी लागतील.मात्र,दिवाळीनंतरच विद्यार्थ्यांना दूध भूकटी मिळेल,असा अंदाज शालेय शिक्षण विभागातील अधिका-यांकडून व्यक्त केला जात आहे.
--------------

शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणा-या विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय आकडेवारी : 
जिल्ह्याचे नाव         विद्यार्थी संख्या 
अहमदनगर         ५,१७,४६१,
अकोला                    १,६५,६०४,
 अमरावती                   २,६८,७३६, 
औरंगाबाद         ४,८५,८७४, 
बीड             ३,८०,५१८,
भंडारा                   १,१७,१४१,
बुलढाणा                   २,९१,७४७,
चंद्रपूर                   १,८३,८४५,
 धुळे             २,७२,४९०, 
गडचिरोली         १,१,५०७,
 गोंदिया                  १,२६,८४०,
 हिंगोली                  १,६०,१६३,
 जळगाव                   ५,४४,५८२,
जालना                   २,५६,६०१,
 कोल्हापूर         ४,३,९९७,
 मुंबई             ६,९९,६७८, 
लातूर             ३,२९,२६२, 
नागपूर                  ३,७६,१०३,
 नांदेड                   ४,६,१६७, 
नंदूरबार                  १,८६,२२९,
 नाशिक                  ६,९३,६७७,
 उस्मानाबाद         १,८६,२२९,
 पालघर                 २,५५,१७३,
 परभणी                 २,५०,५९६,
 पुणे             ७,६२,८५२, 
रायगड                 २,३,६७६,
 रत्नागिरी                १,४२,३९० ,
 सांगली               ३,५,१७१, 
 सातारा               २,७४,६२३,
 सोलापूर               ५,१३,४१९ ,
 सिंधूदूर्ग                ७१,३९१, 
ठाणे             ५,४१,९३०, 
वर्धा             ९८,७९०, 
वाशिम               १,४१,१४२,
 यवतमाळ         २,९३,९९६

Web Title: 1 crore 10 lakh students in the state will get milk powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.