लाइव न्यूज़
 • 10:32 PM

  नवी दिल्ली- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अक्षरधाम मंदिरात दिव्यांची रोषणाई

 • 10:12 PM

  पुणेकरांना लागली थंडीची चाहूल, दोन दिवसांत तापमानात ४ अंशांनी घट

 • 09:45 PM

  अभिनेता आमिर खानने नागरिकांना दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा.

 • 09:06 PM

  अकोला: तेल्हारा तालुक्यातील वरुड बिहाडे येथील शेतकरी वासुदेव महादेव बिहाडे (६५) यांनी दिवाळीच्या दिवशी विषप्राशन करून केली आत्महत्या

 • 09:05 PM

  मालवण- तोंडवळीजवळ समुद्रात दोघे बुडाले, एका पर्यटकाचा मृत्यू, एकावर उपचार सुरू

 • 08:50 PM

  दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीवर बंदी घातली असूनही लोकांनी मोठया प्रमाणावर फटाके फोडले.

 • 08:17 PM

  गुजरात- गांधीनगरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात केलं चोपडा पूजन

 • 08:17 PM

  दिवाळीच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी नाथु ला पास येथे चिनी जवानांना मिठाईची भेट दिली.

 • 07:56 PM

  आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने नौदलाच्या सहा महिला अधिकारी जग सफरीवर गेल्या आहेत.

 • 07:55 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएसव्ही ‘तारिणी’वरील क्रू ला व्हिडिओ कॉल करुन देशाच्यावतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 • 07:55 PM

  हॉकी आशिया कप 2017- भारतानं मलेशियावर 6-2नं केली मात

 • 07:50 PM

  लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने फटाके खरेदीसाठी फटाके विक्रेत्यांच्या स्टॉल्सवर गर्दी उसळली आहे.

 • 07:48 PM

  जव्हारमध्ये एस्. टी. कर्मचाऱ्यांनी डेपो जवळ निषेध व्यक्त करीत, आगरातच पारंपरिक आदिवासी तारपा नुत्य केले.

 • 06:40 PM

  कोल्हापूर - रंकाळा बस स्थानक परिसरात एसटी कर्मचाऱ्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या जीपची केली तोडफोड.

 • 06:31 PM

  जालना : शहरातील भूषण ट्रेडिंग कंपनी या दुकानास आग, दुकानातील संपूर्ण मशिनरी साहित्य जळून खाक, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

 • 06:01 PM

  जम्मू-काश्मीरच्या शोपियनमध्ये पीडीपी आमदाराच्या घरावर ग्रेनेड हल्ला.

 • 05:54 PM

  भाजपाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली. भाजपा हाच नंबर वनचा पक्ष. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सरपंचांचं पुण्यातील बालेवाडीत अधिवेशन घेणार.

 • 05:46 PM

  यवतमाळ- माणिकराव ठाकरे यांचा एसटी कर्मचारी यांच्या संपाला पाठिंबा. कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नाही. मागण्या पूर्ण होईपर्यत संप मागे घेऊ नका. माणिकराव ठाकरे यांचं वक्तव्य.

 • 05:44 PM

  यवतमाळ : केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी अभिजित टेकाम (११) याचा खून पतंगाच्या वादातून झाल्याचे पोलीस तपासात उघड. तीन अल्पवयीन तरूण वडगाव रोड पोलिसांच्या ताब्यात.

 • 05:12 PM

  मुंबई शेअर बाजारात लक्ष्मी पूजनाला सुरुवात, सीईओ आशिष चौहान उपस्थित.

 • 04:30 PM

  मुंबई- दादरमधील ओम गोपाळ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील गाळ्याला गुरूवारी दुपारी लागली आग. फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझविण्यात यश. जिवीतहानी नाही.

 • 03:53 PM

  अहमदनगर : एसटी संप मोडून काढण्यास सरकार सरसावले. खासगी बस आणल्या. तलाठी करणार वाहकाचे काम, तहसिलदार होणार डेपो मॅनेजर.

 • 03:12 PM

  नाशिक : अंगाला माती लावून एसटी कर्मचाऱ्यांनी केले अभ्यंगस्नान. सरकारचा केला निषेध.

 • 02:27 PM

  पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले.

 • 02:07 PM

  बीड : पाटोदा आगारात कर्मचा-यांनी लक्ष्मी पूजनानिमित्त केले बसचे पूजन. 'आमची लढाई प्रशासनाविरोधात आहे. हक्कांसाठी शांततामय मार्गानेच लढण्याचा निर्णय' - एसटी आंदोलक

 • 01:55 PM

  यवतमाळ : दिवाळीदिवशी दोन जण प्यायले विष. दोघांचाही मृत्यू. पांढरकवडा तालुक्याच्या वाठोडा येथील घटना. मृतांची नावं वासुदेव राऊत (६५) व वासुदेव रोंगे (६७). आत्महत्येमागील कारण अस्पष्ट.

 • 01:47 PM

  परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. संप मिटविण्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची शक्यता.

 • 01:24 PM

  औरंगाबाद : मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील विश्रामगृह रिकामे करण्याची ST प्रशासनाची सूचना, तणावाचे वातावरण .

 • 12:36 PM

  कोलकाता- जवाहरलाल नेहरू रोडवरील एलआयसी बिल्डिंगला भीषण आग. फायर ब्रिेगेडच्या दहा गाड्या घटनास्थळी.

 • 12:17 PM

  पिंपरी चिंचवड : वल्लभनगर एसटी आगारातील विश्रांती गृह रिकामे करण्यास सांगितले, पोलीस बंदोबस्तात चालक-वाहकांना आगरातून बाहेर काढण्यात आले.

 • 12:12 PM

  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस : औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या संख्येने कर्मचारी काळ्या फिती लावून आंदोलनात झाले सहभागी.

 • 11:52 AM

  मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेचं लाचलुचपत विभागाला पत्र, शिवसेनेत जाण्यासाठी पैसे देऊ केल्याची तक्रार.

 • 11:33 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मूतील गुरेज सेक्टरमध्ये दाखल. देशाच्या सीमेवरील जवानांसोबत साजरी करणार दिवाळी.

 • 11:31 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जवानांसोबत साजरी करणार दिवाळी.

 • 11:31 AM

  अकोला : जिल्हाधिकारी बंगल्यासमोर उपोषण करून काळी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकरी जागर मंचच्या शेतकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक.

 • 11:14 AM

  उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील गौर ग्रामपंचायत निवडणूक, प्रभाग क्रमांक ३ मध्ये २७ तारखेला फेरमतदान. जिल्हाधिका-यांनी पहिली प्रक्रिया निष्फळ ठरवून जाहिर केला नवीन निवडणूक कार्यक्रम.

 • 11:11 AM

  ओझर (नाशिक) : फुलांचे दर कमालीचे कोसळले आहे. शंभर रुपये शेकडा असलेली फुले दिवाळीच्या दिवशी पन्नास रुपये किलो दरानं मिळत आहेत.

 • 10:49 AM

  आंध्रप्रदेश- काकीनाडामधून चलनातून बाद झालेल्या 1 कोडी 50 लाख रूपयांच्या नोटा केल्या जप्त. एकाला अटक.

 • 10:22 AM

  अयोध्या- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामजन्मभूमीला दिला भेट.

 • 10:03 AM

  पुणे : भोर तालुक्यातील एसटी कामगार संघटनेत फुट शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने 8 गाडया डेपोतून बाहेर काढल्या, वाहतूक सुरू पण प्रवासी नाहीत.

 • 10:02 AM

  जळगाव : एसटी संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल.

 • 09:52 AM

  डेन्मार्क ओपन : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत बाद, चीनच्या चेन यूफेईकडून पराभूत.

 • 09:35 AM

  सांगली : पोलीस निरीक्षक सखाहरी गडदे यांनी स्वत:च्याच सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या. विश्रामबागमधील राहत्या घरी पहाटे केली आत्महत्या.

 • 09:16 AM

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज सोलापूर दौऱ्यावर.

 • 08:48 AM

  मुंबई : आजचे पेट्रोलचे दर 75.45 रुपये, तर डिझेलचे 59.50 रुपये.

 • 08:37 AM

  औरंगाबाद ते जालना रोडवर शेकटा गावजवळ आता 2 अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू.

 • 08:36 AM

  जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के. सकाळी 6.40 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप.

 • 08:17 AM

  ST कर्मचा-यांचा संपाचा आजचा तिसरा दिवस

 • 07:56 AM

  एसटी कर्मचाऱ्यांना ४ ते ७ हजार रुपयांपर्यंत पगारवाढ देण्यास प्रशासन तयार होते, मात्र कर्मचारी नाहीत समाधानी -सूत्र

 • 07:39 AM

  पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिरानं, माहीम स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, बिघाड दुरुस्तीचे काम सुरू.

प्रमोटेड बातम्या