- अंजली भुजबळ
आपण आपल्या बाह्य सौंदर्याविषयी सदैव जागरूक असतो. विशेषत: त्वचा, चेहरा, केसांची काळजी घेतो. मात्र अनेक वेळा हात आणि हाताच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतो. काही महिलांना लांब नखे ठेवण्यास आवडतात. त्यामुळे त्या महिला नेलपेन्ट, नेल आर्टचा उपयोग करु न आपल्या नखांचे सौंदर्य वाढवतात.मात्र घरातील काम करताना हे लांब वाढवलेली नखे तुटतात. यासाठी नखे मजबूत होणे गरजेचे असून नखांची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे. यासाठी एक आठवड्यापेक्षा अधिक काळ नेलपेन्ट नखांवर ठेवू नका. नेलपेन्ट अधिक काळ नखांवर राहिली तर नखं खराब होतात.
>नखांची स्वच्छता
नखं जर वेळच्या वेळी कापली नाही तर ती घाण होतात. याचे अनेक दुष्परिणाम आहेत. बाहेरच्या वातावरणाचा सर्वात आधी नखांवर परिणाम होतो. त्यामुळे नखं घाण होतात. यामुळे नखं के वळ बाहेरु न नाही तर आतून देखील खराब होतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी गरम पाणी आणि साबणाचे मिश्रण तयार करून त्यात दोन्ही हात बुडवून ठेवा काही वेळाने स्क्रबरच्या साहाय्याने स्वच्छ करा.
अंड आणि दूध
अंड आणि दूध आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्याचप्रमाणे ते नखांसाठी उपयुक्त आहे. अंड्याच्या आतील पिवळा भाग दुधामध्ये मिसळून त्याचे मिश्रण नखांना लावा आणि याची काही वेळ मालीश करा. यामुळे नखं मजबूत तर होतील त्याचबरोबर चमकदार बनतील. चांगल्या नखांसाठी डायटमध्ये कॅल्शियम असणे गरजेचे आहे.
आॅलिव्ह आॅइल
आॅलिव्ह आॅइलमुळे के सांना फायदा होतो तसाच नखांना देखील होतो. एक चमचा आॅलिव्ह आॅइलमध्ये तीन ते चार चमचे लिंबाचा रस टाका आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी नखांना लावा, यामुळे नखं मजबूत होतात.
नारळाचे तेल
के सांप्रमाणेच नखांसाठी देखील नारळाचे तेल उपयुक्त आहे. नारळाचे तेल कोमट करु न नखांना मालीश के ल्यास नखं मजबूत होतात.
ेसफरचंदाचा रस उपयुक्त
एक चतुर्थांश सफरचंदाच्या रसामध्ये अर्धा कप बीअर आणि आॅलिव्ह आॅइल यांचे एकत्र मिश्रण तयार करा. आता या मिश्रणामध्ये दोन्ही हातांची नखे पाच मिनिटे बुडवून ठेवा आणि बाहेर काढून नंतर मालीश करा. आठवड्यातून दोन वेळा असे केल्यास नखं मजबूत होतात.
>नखांना आकार देताना क्युटीकल (नखांच्या सुरुवातीची त्वचा)ची काळजी घेतली पाहिजे,अन्यथा ती त्वचा कापली जाण्याची शक्यता असते. नख कापताना ते एकाच बाजूने कापावे आणि शेप देखील एकाच बाजूने द्यावा, वेगवेगळ्या जागांवरून शेप दिल्यास नखं लवकर खराब होतात.
रात्री कोल्ड क्रिमने नखांची मालीश के ली पाहिजे यामुळे नखांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे नखं चमकदार बनतात. रात्री झोपेत नखं तुटण्याची भीती असते यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. लांब नखांच्या सुरक्षेसाठी बाजारात प्लास्टिकची कॅ प मिळते, त्याचा उपयोग तुम्ही नखांच्या सुरक्षेसाठी करु शकता.
पायांचे सौंदर्य हे पायांच्या नखांवरच अवलंबून असते. पायाचा रंग गोरा आणि त्वचा मुलायम असेल आणि नखंच ओबडधोबड असतील तर निश्चितच पाय घाण दिसतात. यामुळे पायाची आणि नखांची स्वच्छता महत्त्वाची आहे यासाठी फू ट स्पा, पॅडिक्योर आणि घरगुती उपाययोजना के ल्या पाहिजेत.
फू ट स्पा एक उत्तम पर्याय आहे. या प्रक्रियेत दोन्ही पाय हे बबलिंग स्पा मशिनमध्ये टाकले जातात. यामुळे पाय ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ होतात. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि पाय मुलायम होतात.
नखांवरील नेलपेन्ट काढण्यासाठी रिमूव्हरचा उपयोग करा यामुळे नखांवरील सर्व नेलपेन्ट निघून जाईल. त्याचबरोबर पॅडिक्युअर हा पर्याय पाय आणि नखे स्वच्छ करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे नखांची देखील योग्य प्रकारे स्वच्छता होते.