सातारा : पाटण तालुक्यातील महिंद लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पातून पाणी वाहत असल्याने भोवताली असणाºया गावातील लोकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.


महिंद धरणाच्या सांडव्यावरुन सद्यस्थितीत पाणी वाहत आहे. तसेच धरण परिसरात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत: तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच धुण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरु नये.

धरणावरुन कोणत्याही प्रकारची वाहतूक न करण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे यांनी केले आहे.