ठळक मुद्देप्रेमात पडल्यानंतर या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर नक्कीच तुमचा जोडीदार रिलेशनशिपबद्दल गंभीर आहे समजा.रिलेशनशिपमध्ये असलेले प्रियकर-प्रेयसी लग्नाबद्दल गंभीर असतील तर ते नातेवाईक, मित्रपरिवाराबरोबर ओळख करुन द्यायला कचरणार नाहीत.

मुंबई - 'ती' आणि 'तो' दोघे परस्परांना ओळखतात. दोघांना एकत्र वेळ घालवायला आवडतो. त्या दोघांच्या दृढ मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात होते. पण प्रेम झाले म्हणून लग्न होईलच असे नाही. सध्याच्या जमान्यात अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर डेट करतात पण लग्न मात्र आई-वडिलांच्या पसंतीनेच करतात. तुम्ही प्रेमात पडल्यानंतर ते नाते विवाहाच्या बोहल्यापर्यंत कसे जाऊ शकते हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत. प्रेमात पडल्यानंतर या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर नक्कीच तुमचा जोडीदार रिलेशनशिपबद्दल गंभीर आहे समजा आणि ते नाते विवाहाच्या मंडपापर्यंत पोहोचू शकते. 

1) रिलेशनशिपमध्ये असलेले प्रियकर-प्रेयसी लग्नाबद्दल गंभीर असतील तर ते नातेवाईक, मित्रपरिवाराबरोबर ओळख करुन द्यायला कचरणार नाहीत. ओळख करुन देणे ही नात्याबद्दल गंभीर असल्याची पहिली पायरी असते. 

2)  त्याने किंवा तिने तुम्हाला कुटुंबियांबरोबर लंच किंवा डिनरला निमंत्रित केलं तर त्याचा अर्थ तुमचा जोडीदार तुम्हाला कुटुंबियांच्या गुड बुक्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुमच्याबद्दल घरच्यांच चांगलं मत तयार करण्याचा प्रयत्न करतोय. 

3) जोडीदाराचं लग्नाबद्दलचं मत जाणून घेण्यासाठी तुम्ही विषय छेडला त्यावेळी जोडीदार तो विषय हसण्यावर नेत असेल तर त्याचा अर्थ लग्नाला विरोध आहे असा होत नाही. भले लग्नाची चर्चा हास्य-विनोदातून होत असली तरी तुमच्या जोडीदाराची लग्नाबद्दलची मत काय आहेत, हे नाते कितीपर्यंत पुढे जाऊ शकते याचा तुम्हाला एक अंदाज येतो.  

4) प्रियकर-प्रेयसीने त्यांची रिलेशनशिप जाहीरपणे स्वीकारली. समोरच्याला ओळख करुन देताना ते प्रियकर-प्रेयसी अशी ओळख करुन देत असतील. दोघांच्याही घरचे तिला आणि त्याला आपल्यापैकी एक समजत असतील तर नक्कीच त्या नात्याचा प्रवास विवाहाच्या दिशेने सुरु असल्याचा अर्थ निघतो. 

5) जोडीदाराने त्याच्या भविष्यातील प्लान्समध्ये सामावून घ्यायला सुरुवात केली. तुमच्या आवडी-निवडीनुसार त्याने काही प्लान्स आखले असतील तर निश्चितच रिलेशनशिपबद्दल तो आणि ती गंभीर आहे. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.