लग्नाआधी नव-याच्या स्वभावातल्या 'या' चार गोष्टी जाणून घ्याच...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 02:29 PM2018-02-05T14:29:27+5:302018-02-05T14:38:12+5:30

जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या अनेक गोष्टी आवडतात. पण लग्नानंतर त्याचा गोष्टींचा त्रास होतो.  

Before marriage, you should know these four things about your husbund | लग्नाआधी नव-याच्या स्वभावातल्या 'या' चार गोष्टी जाणून घ्याच...

लग्नाआधी नव-याच्या स्वभावातल्या 'या' चार गोष्टी जाणून घ्याच...

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रियकर त्याचे ओले टॉवेल बेडवर फेकत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता पण तेच लग्नानंतरही असेच वागणे सुरु राहिले तर तुमची चिडचिड होते. प्रेमात पडल्यानंतर माणूस बहुतेकदा त्याचा मूळ स्वभाव लपवण्याचा प्रयत्न करतो.

मुंबई - जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या अनेक गोष्टी आवडतात. पण लग्नानंतर त्याचा गोष्टींचा त्रास होतो.  उदहारणार्थ रिलेशनशिपमध्ये असताना प्रियकर त्याचे ओले टॉवेल बेडवर फेकत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता पण तेच लग्नानंतरही असेच वागणे सुरु राहिले तर तुमची चिडचिड होते. जर तुम्ही रिलेशनशिपचे नाते लग्नामध्ये बदलणार असाल तर या गोष्टी तपासून घ्या. 

- लग्नाआधी तुम्ही तुमच्या प्रियकराबरोबर एखाद्या विषयावरुन  जोरदार भांडण  करा. भांडणामुळे निश्चित त्रास होईल पण यामुळे तुम्हाला जोडीदाराच्या रागीट स्वभावाची कल्पना येईल. प्रेमात पडल्यानंतर माणूस बहुतेकदा त्याचा मूळ स्वभाव लपवण्याचा प्रयत्न करतो. भांडणानंतर लगेच जोडीदाराने त्याच्यावरचे नियंत्रण गमावले. त्याचा पुरुषी अहंकार आडवा आला. त्याने तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला तर वेळीच स्वत:ला सांभाळा. लग्नानंतर तुम्हाला कदाचित छोटया-छोटया गोष्टींवर मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. जो जोडीदार समजूतदारपणा दाखवून लगेच वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असेल तो निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेईल. 

-   तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरायला जा. फिरताना थकल्यानंतर किंवा मनासारख्या काही गोष्टी नसतील तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी उमटते ते तुम्हाला समजू शकेल. जोडीदारामुळे कुठे तुम्हाला जुळवून घ्यावे लागेल ते तुम्हाला समजू शकते. 

- प्रेमात असताना तुमचा जोडीदार त्याच्यावर सोपवलेले काम किंवा जबाबदारी कशा प्रकारे निभावतो त्यावर लक्ष ठेवा. बेजबाबदार माणसाबरोबर लग्न करणे टाळा, अन्यथा मनस्ताप वाटयाला येईल. 

- पती-पत्नीमध्ये अनेकदा पैसे खर्च करण्यावरुन मोठे वाद होतात. जर तुम्ही दोघेही खर्चाचा हिशोब ठेवत असाल तर चिंतामुक्त आयुष्य जगता येईल तसेच कुठे जास्त पैसे खर्च करायचे, कुठे कमी ते तुम्हाला समजू शकेल.                            
 

Web Title: Before marriage, you should know these four things about your husbund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.