आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर हा लेख जरूर एकदा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 09:54 PM2018-09-19T21:54:21+5:302018-09-19T21:58:05+5:30

मी संध्याकाळी शाळेतून घरी आले होते डोके जाम झालेले अगदी ठणकत होते.मी यांना म्हटलं माझे डोके खूप दुखते आहे.त्यांनी लगेच मला पुढचा प्रश्न विचारला काय झाले शाळेत

If you want to keep your mental health better, then definitely read this article | आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर हा लेख जरूर एकदा वाचाच

आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर हा लेख जरूर एकदा वाचाच

Next

रवंथ हे फक्त गाई गुरेच नाहीत करत तर त्यांच्याहूनही अधिक माणसांना रवंथ करायची सवय लागली आहे.थोडे तुम्हाला आश्चर्यही वाटेल माणसं कसलं रवंथ करतात. मला इथे पान, तंबाखू किंवा गुटखा खाऊन केलेल्या रवंथा बद्दल बोलायचेच नाही.आता या पेक्षा हि वेगळे रवंथ कोणते ते सांगते .

मी संध्याकाळी शाळेतून घरी आले होते डोके जाम झालेले अगदी ठणकत होते.मी यांना म्हटलं माझे डोके खूप दुखते आहे.त्यांनी लगेच मला पुढचा प्रश्न विचारला काय झाले शाळेत आज?अर्थातच, मी याच गोष्टीची वाट पाहत असावे.मी पटकन शाळेत झालेला मनस्ताप इतिवृत्ता सह यांना सांगितला.वाटले आता तरी जरा आराम वाटेल डोक्याला. पण शक्य नव्हते.जरा वेळाने आईचा फोन आला व आईने हि पटकन ओळखले की हिचे कांही तरी बिघडले आहे. त्यावर पुन्हा मी तिलाही घडला प्रसंग इतिवृत्तासह सांगितला. व अशा पुन्हा पुन्हा त्या विषयाची चर्चा व त्यातून पुनरावृत्ती होत गेल्यामुळे माझा त्रास वाढत गेला यांनी स्पष्टपणे सांगितले हि," अगं किती हा विषय चघळत बसणार आहेस" ..ते सहज बोलून गेले व माझ्या डोक्याची ट्युब पेटली की मी त्याच त्याच घडलेल्या गोष्टींचे रवंथ करत होते मला समजून चुकले होते की मनातल्या या संवाद तुकड्यांना मनात केंद्रस्थान मिळालं की मला त्रास व्हायचा ..हीच गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते बऱ्याच वेळा एकटे असताना ,झोपण्यापूर्वी तेच तेच संवाद,एखादं गाणं, गाण्याची ओळ,किंवा मनावर ठासलेलं एखादं दृश्य मनात दीर्घकाळ उगाळत राहतं.व त्याचा आपल्यावर परिणाम होऊ लागतो.

बऱ्याच वेळा एखादा संवाद,प्रतिमा,आपल्या मनात घर करून राहतात व त्या विसरता विसरत नाहीत कारण या गोष्टीचे आपण रवंथ केलेले असते..

आता या रवंथा बाबत थोडा विचार करूयात अशा रवंथ करण्याच्या सवयीमुळे आपले कामाकडे दुर्लक्ष होते का? अशा रवंथामुळे झोप उडते का?मन चिडचिड होते का? मन विचलित होते का? मनाचं संतुलन बिघडतं का? असे जर होत असेल तर हे रवंथ आपल्याला विकृतीकडे नेत आहे असे समजावे.

आता आपण रवंथ करण्याचा दुसरा प्रकार समजून घेवूयात बऱ्याच वेळा कांही प्रसंगामुळे आपल्याला स्फूर्ती येते ,आनंद वाटतो असे अनुभव ,सवयी केंव्हाही श्रेष्ठ असतात पण ,त्याचा संबंध जर आपण दुसऱ्या गोष्टीशी जोडत गेलो तर ती पुन्हा विकृती ठरण्यास वेळ लागत नाही.उदा.कांही रिवाज,प्रथा ज्या पडल्या जातात त्या अशाच प्रकारच्या असाव्यात बऱ्याच वेळा आपणसुद्धा एखादी चांगली घटना घडली तर हाच माझा लकी शर्ट अथवा साडी आहे असे सहज म्हणून जातो व त्या प्रसंगाचा व वस्तूचा संबंध जोडतो .पण हे प्रमाण वाढत गेले तर मूळ हेतू कोणता हे बाजूलाच राहते व नाही त्या गोष्टीचा विचार करू लागतो याच गोष्टीतून लकी कलर ची,लकी हिरा,मोती,खडा घालण्याची पध्द्त रुजली असावी .मला वाटते एखादे व्यसन सुद्धा यातूनच जडत असावे खरे पाहता याचा वास्तविक जीवनाशी कांही संबंध नसतो.बऱ्याच वेळा एखादा रिवाज पाळला नाही तर अपराधी पणाची भावना निर्माण होते,कांही तरी पाप घडले असे वाटू लागते,विशिष्ट गोष्ट केली नाही म्हणून असे घडले असे मत करून घेऊन आपणच आपल्या मनाचा छळ करू लागतो..व पुन्हा आपण त्या जाळ्यात ओढले जातो..यावर एकच उपाय म्हणजे रवंथ करणे थांबवावे.मग ते कोणत्याही प्रकारचे असो. चांगल्या अथवा वाईट गोष्टीची मनावर होणारी वारंवारिता थांबविल्यास आपले बरेच प्रॉब्लेम नाहीसे होऊ लागतील अगदी शंभर टक्के

मग बंद करणार ना रवंथ....

लेखिका: सुषमा सांगळे-वनवे   

साहित्यिक

Web Title: If you want to keep your mental health better, then definitely read this article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य