लग्नानंतर चुकूनही या पाच गोष्टी लगेच करु नका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 01:05 PM2018-01-29T13:05:47+5:302018-01-29T13:08:03+5:30

लग्नानंतर जबाबदारी वाढल्यामुळे पती-पत्नीच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. प्रियकर-प्रेयसी असताना ज्या गोष्टी मस्करीमध्ये घेतल्या जात होत्या. त्याच विषयांवर दोघेही नंतर गंभीर होतात.

Dont do these five things after marriage | लग्नानंतर चुकूनही या पाच गोष्टी लगेच करु नका

लग्नानंतर चुकूनही या पाच गोष्टी लगेच करु नका

googlenewsNext

मुंबई - लग्नानंतर जबाबदारी वाढल्यामुळे पती-पत्नीच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. प्रियकर-प्रेयसी असताना ज्या गोष्टी मस्करीमध्ये घेतल्या जात होत्या. त्याच विषयांवर दोघेही नंतर गंभीर होतात. त्यामुळे लग्नानंतर दोघांनीही काही गोष्टींचे भान बाळगणे आवश्यक आहे. लग्नानंतर चुकूनही या विषयांचा आपल्या जोडीदाराजवळ उल्लेख करु नका. अन्यथा नात्यात तणाव निर्माण होईल.

- लग्नामध्ये झालेल्या खर्चाला मुद्दा बनवू नका. लग्नामध्ये झालेल्या खर्चाचा विषय वारंवार उपस्थित करुन त्यावरुन वाद निर्माण होईल अशी स्थिती उत्पन्न करु नका. 

- लग्नानंतर नातेवाईकांना विनोदाचा विषय बनवणे टाळा. मुलाने मुलीला तिच्या नातेवाईकांवरुन टोमणे मारु नये तसेच मुलीनेही मुलाच्या घरच्यांवरुन कोणतीही आपत्तीजनक प्रतिक्रिया देऊ नये. अन्यथा मोठा वाद अटळ आहे. 

-  नवरा-बायको दोघांनीही पूर्व प्रियकर किंवा पूर्व प्रेयसीशी तुलना करु नये. तुमचे नवीन लग्न झालेले असताना लगेचच अशा प्रकारची तुलना करणे घातक ठरु शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात त्यामुळे वादळ येऊ शकते. 

- लग्नातल्या एखाद्या घटनेवरुन पत्नीने पतीला त्याच्या मित्रपिरवारावरुन सुनावणे किंवा पतीने पत्नीला तिच्या मैत्रिणींवरुन बोलण्यामुळे अहंकार दुखावला जातो आणि विनाकारण भांडण सुरु होते. 

-    लग्नानंतर अनेकदा मुली  ते तुझे काम आहे त्यामुळे तूच कर असे मुलांना सांगतात. खरतर ज्याच काम आहे त्यानेच केलं पाहिजे त्यात काहीही चुकीच नाही पण आता तुम्ही पती-पत्नी आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला संपूर्ण आयुष्य एकत्र काढायचं आहे. परस्परांना मदत केल्याशिवाय पुढचा प्रवास कठिण होऊ शकतो. त्यामुळे कोणाच काम आहे यापेक्षा दोघांनीही एकमेकांना त्या कामात मदत करण जास्त महत्वाच आहे.                                   

वरती नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला क्षुल्लक वाटू शकतात. पण काहीवेळा अशा छोटा-छोटा गोष्टी घटस्फोटाला कारण ठरतात. त्यामुळे या गोष्टी टाळल्या तर वैवाहिक जीवन अधिक सुखी आणि समुद्ध होईल. लग्न फक्त दोघांचे नसते ते दोन कुटुंबांचे मनोमिलन असते. 
 

Web Title: Dont do these five things after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.