तुमचे बॉडी टाइम तुम्हाला माहिती आहे का? 

By अोंकार करंबेळकर | Published: September 27, 2018 05:13 PM2018-09-27T17:13:27+5:302018-09-27T17:13:51+5:30

प्रत्येकाचे घड्याळ वेगवेगळ्या गतीने चालत असते. जर व्यक्तीला पर्सनलाइज्ड मेडिसिन द्यायचे असेल तर त्याच्या शरीराचे घड्याळ माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत निद्रातज्ज्ञ डॉ. मार्क वू यांनी सांगितले. डॉ. मार्क  हे जोन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर विद्यापीठ येथे कार्यरत आहेत. 

Do you know your body time? | तुमचे बॉडी टाइम तुम्हाला माहिती आहे का? 

तुमचे बॉडी टाइम तुम्हाला माहिती आहे का? 

Next

लंडन-आपल्या हातातलं घड्याळ जी वेळ दाखवतंय तीच आपली वेळ असा समज असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. तुमच्या शरीराच्या आत असलेल्या घड्याळाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आता शास्त्रज्ञांनी केवळ रक्ताच्या चाचणीवरुन आपल्या इंटर्नल क्लॉकची वेळ सांगू शकतो असा दावा केला आहे. यावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी टाइम सिग्नेचर चाचणीद्वारे साधारणपणे डझनभर जनुकांद्वारे व्यक्तीच्या सिर्काडियन रिदमचा उलगडा करता येतो असे सांगितले. सिर्काडियन रिदम ही एक प्रक्रिया असून यामध्ये शरीर व मेंदूचे झोपेतील व जागेपणीचे चक्र असते. 

प्रत्येकाचे घड्याळ वेगवेगळ्या गतीने चालत असते. जर व्यक्तीला पर्सनलाइज्ड मेडिसिन द्यायचे असेल तर त्याच्या शरीराचे घड्याळ माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत निद्रातज्ज्ञ डॉ. मार्क वू यांनी सांगितले. डॉ. मार्क  हे जोन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर विद्यापीठ येथे कार्यरत आहेत. 
१२ तासाच्या अंतराने घेतलेले रक्ताचे दोन नमुने तुमच्या अंतर्गत घड्याळाबद्दल ठोस भाष्य करु शकतात असे या संशोधनाच्या प्रमुख रोजमेरी ब्राऊन यांनी सांगतिले आहे.

 रक्तामधील ४० जनुकांचे परीक्षण करुन व्यक्तीच्या शारीरिक घड्याळाची माहिती दीड तासामध्ये आपण देऊ शकतो असे त्या म्हणाल्या. त्या शिकागोतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिन प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन विष़याच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत.
 केवळ निद्रानाशच नव्हे तर इतर अनेक आजारांमध्ये औषध देण्यास रुग्णाची शारीरिक वेळ समजल्यास मदत होणार आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास कोलेस्ट्रॉल कमी कमी करणारे स्टॅटीन औषध रुग्ण साधारणत: झोपेच्या तयारीत असताना चांगल्या पद्धतीने काम करते कारण ते रोखत असलेले एन्झाइम संध्याकाळी जास्त कार्यरत असते, अशी माहिती डॉ. वू यांनी दिली. कर्करोगासाठी किमोथेरपीही दिवसातील ठराविक वेळेस दिल्यास अधिक परिणामकारक ठरते.
प्रत्येकाचे शारीरिक घड्याळ सर्व अवयवांची हालचाल आणि कार्यपद्धती ठरवत असते. त्यामुळे नाइटशिफ्ट करणाºया किंवा दूरवर विमानप्रवास करुन जाणाऱ्या लोकांच्या शरीराची वेळ आणि बाहेरच्या जगातील वेळ जुळत नाही. त्यामुळे त्यांना त्रासही होतो. 
 

Web Title: Do you know your body time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.