पाणी बचतीसाठी काटकसर; २० एमएलडीने उपसा घटवला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 07:27 PM2019-01-10T19:27:35+5:302019-01-10T19:27:55+5:30

७० एमएलडीची गरज असताना ५० एमएलडी उचलले जात आहे पाणी

Water saving in latur 20 MLD reduced | पाणी बचतीसाठी काटकसर; २० एमएलडीने उपसा घटवला

पाणी बचतीसाठी काटकसर; २० एमएलडीने उपसा घटवला

Next

लातूर : शहरासाठी दैनंदिन पाण्याची गरज ७० एमएलडी आहे. परंतु, जून अखेर पाणी पुरावे म्हणून लातूर मनपाने मांजरा प्रकल्पातून दररोज ५० एमएलडी पाणी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. २० एमएलडी पाणी कमी उचलले जात आहे. जेणेकरून पाण्याची बचत होऊन आगामी पावसाळ्यापर्यंत ते पुरविण्याचा प्रयत्न आहे. 


लातूर शहराला पाणी पुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात ३३ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. २०१८ च्या पावसाळ्यात या प्रकल्पात पाण्याचा एक थेंबही संचय झाला नाही. २०१७ मधील पावसाळ्यातील पाण्यावर लातूर शहराची तहान भागविली जात आहे. त्यामधीलच ३३ दशलक्ष घनमीटर पाणी सध्या मांजरा प्रकल्पात आहे. या प्रकल्पातून लातूर शहरासाठी यापूर्वी दररोज ७० एमएलडी पाणी उचलले जायचे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून ५० एमएलडी पाणी उचलले जात आहे. जून अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी मनपा प्रशासनानेही काटकसर सुरू केली आहे. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा. नळाला पाणी आल्यानंतर वाया घालवू नये.

बाथरुममध्ये सोडणे, वाहने धुणे, रस्त्यावर सडा मारून पाण्याची नासाडी करणे आदी प्रकार नागरिकांनी थांबवून मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. काटकसरीने या पाण्याचा वापर केल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी पुरू शकते. त्यासाठी सर्व लातूरकरांनी पाणी बचतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले. 


१० हजार १६ पॉवर पंप कार्यान्वित... 
लातूर मनपाचे शहरात १० हजार १६ पॉवर पंप आहेत. बहुतांश पॉवर पंप रिचार्ज केलेले आहेत. यातील दहा-पाच पॉवर पंपाचा अपवाद वगळता सर्व पंप सुरू आहेत. पाणीही चांगले आहे. त्यासाठी स्टँड पोस्ट लावण्यात आले आहेत. या पॉवर पंपाद्वारे संबंधित नगरातील नागरिकांना पाणी मिळते, असेही पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले. 


पाणी पुरवठ्याचे पूर्वीचेच वेळापत्रक... 
काटकसरीचा उपाय म्हणून दहा दिवसांआड पाणी देण्याचा मनपा प्रशासनाचा विचार होता. परंतु, स्थायी समितीच्या सभागृहात या विषयाला मंजुरी न मिळाल्यामुळे पाणी पुरवठा वितरणाचे पूर्वीचेच वेळापत्रक असून, सध्या आठ दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: Water saving in latur 20 MLD reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.