उदगीरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापा-यांनी पुकारला बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 05:38 PM2017-11-24T17:38:42+5:302017-11-24T17:46:37+5:30

शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी व्यापा-यांकडून मागणी आहे.

In Udgir, the traders called out to remove encroachment | उदगीरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापा-यांनी पुकारला बेमुदत बंद

उदगीरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापा-यांनी पुकारला बेमुदत बंद

googlenewsNext
ठळक मुद्देआज सकाळी हातगाडाचालक व एका व्यापा-यात बाचाबाची झाली़. यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यापा-यांनी अतिक्रमणे व हातगाडे काढण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. दिवसभरात १० लाखांची उलाढाल ठप्प

उदगीर : शहराची बाजारपेठ असलेल्या पत्तेवार चौकात हातगाडे थांबत आहेत़ त्याचबरोबर काहींनी अतिक्रमण केले आहे़ परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण होते. यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी येथील व्यापा-यांकडून मागणी आहे. यातच आज सकाळी हातगाडाचालक व एका व्यापा-यात बाचाबाची झाली़. यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यापा-यांनी अतिक्रमणे व हातगाडे काढण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे दिवसभरात जवळपास १० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे.

शहरातील पत्तेवार चौक व परिसरात हातगाडे थांबतात़ त्याचबरोबर अतिक्रमणांनी विळखा घातला आहे़ त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी ये-जा करणा-या अबालवृध्दांना त्याचा त्रास होत आहे़ अतिक्रमणांचा सर्वाधिक त्रास महिला, मुलींना होत आहे़ सन २०११ मध्ये पत्तेवार चौकातील व्यापा-यांनी या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची चौकी उभारावी अशी मागणी केली होती़ परंतु, ती अद्यापही पूर्ण झाली नाही. या चौक परिसरात किराणा, भुसार, मेडिकल, भांडी, गृहउपयोगी वस्तू ते भाजीपाल्याची बाजारपेठ आहे़ त्यामुळे खरेदीसाठी अबालवृद्धांची नेहमी गर्दी असते़ या परिसरात सुरक्षितता आणि वाहतुकीची शिस्तीसंदर्भात ‘लोकमत’मधून यापूर्वी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते़ त्यामुळे आमदार सुधाकर भालेराव, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, मुख्याधिकारी नितीन कापडणीस, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे आदींनी पुढाकार घेऊन या भागातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली होती़ परंतु, नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्यात एकी न झाल्याने ही मोहीम थंडावली.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी एक व्यापारी व एका हातगाडेचालकात वाद होऊन बाचाबाची झाली़ त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी अतिक्रमणे व हातगाडे हटवावेत, अशी मागणी करीत बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्यास सुरुवात केली़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे व नगर परिषदेचे अधिकारी गोलंदाज यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन व्यापाºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, व्यापाºयांनी आपण माघार घेत नसल्याचे स्पष्ट करीत निवेदन दिले़ या भागातील हातगाडे, अतिक्रमणे हटवावीत, सेंट्रल पार्किंग बंद करावी, रस्ते खुले करावेत, अशा मागण्या व्यापा-यांनी केल्या आहेत़

अतिक्रमणांमुळे व्यापा-यांत असुरक्षिततेची भावना़
या भागात पोलीस मदत केंद्र निर्माण करावे, अशी आम्ही सन २०११ पासून मागणी करीत आहोत़ तसेच हातगाडे थांबत असल्याने आणि अतिक्रमणे वाढल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे़ व्यापारीही त्रस्त झाले आहेत़ पोलीस मदत केंद्रासंदर्भात पोलीस महासंचालकांपर्यंत मागणी करण्यात आली होती़ याच मागणीसाठी १८ ते २० आॅगस्ट २०११ या कालावधीत बाजारपेठ बंदही ठेवण्यात आली होती, असे व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी रामदास जळकोटे यांनी सांगितले़ 

अतिक्रमण हटाव मोहीम राबवू़
शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषद कटिबध्द आहे़ शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीमही सुरु करण्यात आली होती़ परंतु, वेळेवर पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही मोहीम थंडावली़ आता पुन्हा मोहीम सुरु करण्यात येईल, असे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी सांगितले़ दरम्यान, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले, अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषदेला सर्व सहकार्य केले जाईल.

Web Title: In Udgir, the traders called out to remove encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.