धक्कादायक! फिर्यादी मुलगाच निघाला वडिलांच्या खुनाचा आरोपी, पोलिसांनी 24 तासांतच लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 10:28 PM2018-09-17T22:28:47+5:302018-09-17T22:29:38+5:30

पोलिसांनी अधिक तपास केल्यावर फिर्यादी मुलगाच आरोपी निघाला असून त्यास सोमवारी अटक करण्यात आली आहे.

Shocking, The accused son went to the police station for murder of the father, in 24 hours probe by police | धक्कादायक! फिर्यादी मुलगाच निघाला वडिलांच्या खुनाचा आरोपी, पोलिसांनी 24 तासांतच लावला छडा

धक्कादायक! फिर्यादी मुलगाच निघाला वडिलांच्या खुनाचा आरोपी, पोलिसांनी 24 तासांतच लावला छडा

किल्लारी (जि़ लातूर)- औसा तालुक्यातील संक्राळ येथे नामदेव सहदेव माळी (६५) यांचा स्वत:च्या शेतात विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी मुलाने दिलेल्या माहितीवरून किल्लारी पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, पंचनामा व पोस्टमार्टम रिपोर्टनंतर अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला.  

पोलिसांनी अधिक तपास केल्यावर फिर्यादी मुलगाच आरोपी निघाला असून त्यास सोमवारी अटक करण्यात आली आहे. 15 सप्टेंबर रोजी सकाळी नामदेव सहदेव माळी (65) यांच्या  ङोक्यात व ईतर ठिकाणी मारुन त्यांच्या शेतातील विहीरीत टाकण्यात आले होते़ याप्रकरणी मुलगा बालाजी नामदेव माळी याने किल्लारी पोलिस स्टेशनला वडिल नामदेव माळी यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहीती दिली़ त्यानुसार आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती़ मृतदेहाचा शवविच्छेदनाचा अहवाल रविवारी आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला़ यात फिर्यादी मुलानेच बापाच्या कपाळावर व इतर ठिकाणी मारून खून केल्याचे उघडकीस आले. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत विहिरीत टाकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सपोनि संदीप कामत, पोउपनि़ गणेश कदम, पोहेकॉ गणेश यादव, पोकॉ साहेबराव सावंत यांनी खूनाचा उलगडा केला आहे. याबाबत पोहकॉ गणेश यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालाजी नामदेव माळी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

Web Title: Shocking, The accused son went to the police station for murder of the father, in 24 hours probe by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.