औसा (जि. लातूर) : उपग्रहाद्वारे झालेल्या एका सर्वेक्षणानुसार औसा तालुक्यातील काही भागांत हायड्रोकार्बन असण्याची शक्यता समोर आली होती़ या पार्श्वभूमीवर केंद्रीय भूगर्भ संशोधन पथकाने शिंदाळा जहांगीर शिवारातील मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले़ या नमुन्यांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक खनिज आढळले तर पुढील संशोधन होणार आहे़
यंत्राद्वारे रेडिएशन ब्लास्ट करून हायड्रोकार्बन वा इतर इंधन उपलब्ध होऊ शकते का, याची तपासणी करण्यासाठी माती नमुने घेणे आवश्यक आहे़ त्यामुळे गंगापूर, जमालपूर, बोपला, मातोळा, पेठ, शिंदाळा, जहांगीर या ठिकाणचे माती नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पुणे व दिल्ली येथील प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार आहेत़
इंधन सापडल्याची अफवा
शिंदाळा जहांगीर येथील बालाजी मंदिर परिसरातील साळुंके यांच्या शेतात विंधन विहीर घेण्यात येत होती़ त्याच दरम्यान माती नमुने घेतले जात असल्यामुळे भूगर्भात पेट्रोल-डिझेलची खाण सापडल्याची अफवा पसरली होती.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.