Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी देवणी तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 07:43 PM2018-08-09T19:43:40+5:302018-08-09T19:45:00+5:30

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला देवणीत उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Marashatra Bandh: For the Maratha reservation, stop smoking in Deoni taluka | Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी देवणी तालुक्यात कडकडीत बंद

Marashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी देवणी तालुक्यात कडकडीत बंद

Next

देवणी (लातूर ) : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला देवणीत उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. देवणी शहर व तालुक्यात  कडकडीत बंद पाळण्यात आला. 

सकाळी आठ पासूनच कार्यकर्ते हातात भगवी पताका घेऊन घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले होते. या बंदला देवणी व तालुक्यातील वलांडी,बोरोळ,लासोना,व ईतर गावातही प्रतिसाद मिळाला.

बंद दरम्यान देवणीतील बाजार, शाळा, महाविद्यालये, पेट्रोल पंप व सर्व खाजगी कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. तसेच एसटी महामंडळाने सकाळपासूनच बस बंद ठेवल्याने बसस्थानक ओस पडले होते.
 

Web Title: Marashatra Bandh: For the Maratha reservation, stop smoking in Deoni taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.