धर्मांतरानंतर टांझानियाला निघालेल्या लातूरच्या तरुणाला अटक; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 03:04 PM2019-01-13T15:04:02+5:302019-01-13T15:30:56+5:30

लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये धर्मांतर करून टांझानियाला निघालेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने हे कारवाई केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

man arrested in latur for carry fake passport documents and religion conversion | धर्मांतरानंतर टांझानियाला निघालेल्या लातूरच्या तरुणाला अटक; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

धर्मांतरानंतर टांझानियाला निघालेल्या लातूरच्या तरुणाला अटक; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

Next
ठळक मुद्देलातूर जिल्ह्यातील उदगीरमधील धर्मांतर करून टांझानियाला निघालेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने हे कारवाई केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. नरसिंग बिदर जिल्ह्यातील झहिराबादचा रहिवासी आहे.

लातूर - लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील धर्मांतर करून टांझानियाला निघालेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने हे कारवाई केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या तरुणाने धर्म परिवर्तन करून व खोट्या माहितीच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून पासपोर्ट व इतर कागदपत्रे मिळवली होती. नरसिंग जयराम भुयकर उर्फ महमद रेहान इबनेआदम (30) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंग बिदर जिल्ह्यातील झहिराबादचा रहिवासी आहे. तो उदगीर येथे एका बेकरीत काम करत होता. धर्मांतर करून त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यानंतर  आधारकार्ड, पॅनकार्ड, आई-वडिलांचे बनावट पॅनकार्ड बनवून पासपोर्ट काढला. तसेच आई-वडिलांचे काल्पनिक नाव, शैक्षणिक पात्रता व कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता याबाबतही खोटी माहिती दिली. मात्र बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने शासनाची फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे.दहशतवादविरोधी पथकाने उदगीरमध्ये धाड टाकून नरसिंगला अटक केली आहे. 

Web Title: man arrested in latur for carry fake passport documents and religion conversion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.