अवेळी जेवणामुळे मूतखडा होण्याचा धोका; बाहेरचे खाद्य पदार्थ टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 08:00 PM2018-11-06T20:00:05+5:302018-11-06T20:00:33+5:30

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे मानवी आजारांचे प्रमुख कारण आहे. अलिकडे मूतखड्याचे आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Due to unhygienic diet; Avoid outdoor foods | अवेळी जेवणामुळे मूतखडा होण्याचा धोका; बाहेरचे खाद्य पदार्थ टाळा

अवेळी जेवणामुळे मूतखडा होण्याचा धोका; बाहेरचे खाद्य पदार्थ टाळा

Next

लातूर : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे मानवी आजारांचे प्रमुख कारण आहे. अलिकडे मूतखड्याचे आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अवेळी जेवण आणि बाहेरचे खाद्य पदार्थ खाणे, त्याशिवाय जेवणात मिठाचे प्रमाण अधिक असणे हे मूतखडा होण्याचे प्रमुख कारण असल्याचे डॉ. विद्यासागर बाहेती यांनी सांगितले. 
आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. या आजाराचे मानवी शरिरावर सातत्याने आक्रमण होत आहे. सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस योग्य आहार हे महत्त्वाचे आहे. अलिकडे मूतखड्याच्या आजाराने त्रस्त असणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. 
‘योग्यवेळी योग्य उपचार’ या पद्धतीचा वापर केला तर मूतखड्यासारख्या आजाराला आपण दूर ठेवू शकतो, असे मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. विद्यासागर बाहेती यांनी सांगितले. हा आजार एक वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला होऊ शकतो. पाठीत दुखणे, कळ मारून उलटी होणे, लघवीच्या वेळी जळजळ होणे, लघवीतून रक्त बाहेर पडणे आदी लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे. मूतखड्याच्या आजाराचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी महत्त्वाची आहे. यामुळे मूतखड्याच्या आजाराचे निदान होते. शिवाय, खड्याचे आकारमान समजण्यासाठी मदत होते. हा आजार टाळण्यासाठी बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावेत. त्याशिवाय जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्यात, वेळी-अवेळी जेवण करणे टाळावे, आहारामध्ये मिठाचे प्रमाण प्रमाणात असले पाहिजे. त्याशिवाय, पालक, मांसाहार, काजू, रताळे आणि सोडायुक्त शीतपेय टाळले पाहिजेत. अशा खाद्य पदार्थ व शीतपेयांपासून मूतखडा होण्याचा अधिक धोका असतो. 
हा आजार होऊ नये, यासाठी भरपूर प्रमाणात फळे खावीत. कॅल्शियमचे पदार्थ खाणे, मोसंबी, संत्र्याचे ज्यूस समप्रमाणात घ्यावे, दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, ज्यामुळे मूतखड्यासारखा आजार टाळता येईल, असेही डॉ. बाहेती म्हणाले.

समज आणि गैरसमज... 
मूतखडा या आजारासंदर्भात अनेक समज आणि गैरसमज आहेत. दुधामुळे मूतखडा होतो, याकडे लोकांनी लक्ष न देता डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. दुधामुळेच शरिराला कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर कॅल्शियमचा अभाव असेल, तरी देखील मूतखडा होऊ शकतो असेही डॉ. बाहेती म्हणाले.

Web Title: Due to unhygienic diet; Avoid outdoor foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.