लातूर : शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतक-यांची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केली, असा आरोप करीत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारअर्ज देण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ३०२, ३०६, ४२० नुसार गुन्हे नोंद करावेत, असा तक्रारअर्ज लातूर ग्रामीण पोलीस ठाणे, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर इ. पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. तक्रारी मात्र संबंधित पोलीस ठाण्यांनी स्वीकारल्या आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सत्तेत आल्यास शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून भाव देऊ, शेतकºयांचा सात-बारा कोरा करू, असे जाहीर सभेतून व पक्षाच्या जाहीरनाम्यातून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शेतकºयांचे कोणतेच प्रश्न सरकारने सोडविले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर गुन्हे नोंदवावेत, असे संघटनेने तक्रारअर्जात म्हटले आहे.