ठळक मुद्दे बाईक येताच त्याला साईड देण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली ५ फुट खोल खड्ड्यात कोसळली.

उदगीर ( लातूर ), दि. १५ : औराद कडून उदगीरकडे येणारी कर्नाटक आगाराची बस (क्र. केए. 38 एफ 538) शेल्हाळजवळ पुलावरून खाली कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून ४० जन जखमी झाले आहेत. 

या बाबत प्रत्यक्षदर्शिंच्या माहिती नुसार, सकाळी शेल्हाळजवळ बस समोरून बाईक येताच त्याला साईड देण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली ५ फुट खोल खड्ड्यात कोसळली. खाली कोसळताच बस ने पलटी घेतली.  या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४० जन जखमी झाले आहेत. मृतात १९ वर्षीय ममता रमेश सगर (रा. मुर्की ता.औराद जि. बिदर) या तरुणीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी मदत कार्य सुरु करत जखमींना बाहेर काढले. जखमींवर उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.