Atul Kulkarni received the Darpan Seva Gaurav Award | अतुल कुलकर्णी यांना दर्पण सेवा गौरव पुरस्कार  

अहमदपूर (जि. लातूर) : येथील साहित्य संगीत कला अकादमीतर्फे दिला जाणारा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार २०१७’ ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी (मुंबई) यांना जाहीर झाला आहे.
स्थानिक पातळीवर पत्रकार रविकांत क्षेत्रपाळे व प्रशांत शेटे यांना गौरव करण्यात येणार आहे. शाल, स्मृतिचिन्ह-लेखणी, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ म्हणजेच ७ जानेवारी २०१८ रोजी अहमदपूर येथे देणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.


Web Title: Atul Kulkarni received the Darpan Seva Gaurav Award
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.