after murdered wife husband surrenders in police station | किल्लारीत पत्नीची हत्याकरून पती झाला पोलीस ठाण्यात हजर 

किल्लारी ( लातूर) : किल्लारी येथील एकाने आपल्या पत्नीची  घरी गळा आवळून हत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी पतीने किल्लारी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, उस्मानाबाद जिल्ह्यातील बाभळगाव येथील किरण शाहुराज बिराजदार (२७) हा येथील एका पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तो पत्नी अश्विनी (२१) समवेत किल्लारीतील ओम पारुडकर यांच्या घरी भाड्याने राहत असे. आज दुपारी १२ वा़च्या सुमारास किरण याने अश्विनीची गळा आवळून हत्या केली. यानंतर किरण हा स्वत:हून किल्लारी पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने तेथे आत्मसमर्पण केले. या घटनेप्रकरणी अद्याप कुणाचीही फिर्याद दाखल झाली नसल्याचे तपास अधिकारी पीएआय चक्रे यांनी सांगितले.