लातूर जिल्ह्यातील 142 प्रकल्पांत 16 टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 10:50 PM2018-09-16T22:50:36+5:302018-09-16T22:50:58+5:30

मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के तर जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा 

16 percent water supply in 142 projects in Latur district | लातूर जिल्ह्यातील 142 प्रकल्पांत 16 टक्के पाणीसाठा

लातूर जिल्ह्यातील 142 प्रकल्पांत 16 टक्के पाणीसाठा

Next

हणमंत गायकवाड
लातूर - यंदाच्या पावसाळ्यात 455.3 मि़मी़ पाऊस झाला असला तरी प्रकल्पांतील पाणीसाठा तळालाच आहे़ दोन मोठ्या, आठ मध्यम आणि 132 लघु प्रकल्पांत केवळ 16 टक्के उपयुक्त पाणीसाठी आहे़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात तर केवळ 3.4 टक्केच पाणी आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लातूर जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी पाऊसमान 725 मिमी आहे. आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असला तरी महसूल मंडळनिहाय सारखा पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पांत पाण्याचा संचय झालेला नाही़ मांजरा प्रकल्प क्षेत्रात तर केवळ 277 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब या शहरांना पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के पाणी आहे़ परतीच्या पावसावरच आता आशा आहे़ लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीच नाही़ 3.504 दलघमीचा मृतसाठा आहे. रेणा प्रकल्पात 2.638 दलघमी उपयुक्त पाणी आहे़ व्हटी मध्यम प्रकल्पातही मृत म्हणजे 1.060 दलघमी पाणी आहे़ तिरू मध्यम प्रकल्पातही 0.050 दलघमी उपयुक्त पाणी संचित झाले आह़े़ देवर्जन प्रकल्पात मात्र बऱ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा असून, हा प्रकल्प 41.78 टक्के भरला आहे़ साकोळ प्रकल्पातही 60.44 टक्के तसेच घरणी मध्यम प्रकल्पात 95.18 टक्के आहे़ मसलगा प्रकल्पात 45.5 टक्के पाण्याचा संचय झाला आहे़ लघु आणि मध्यम असे एकूण 140 आणि 2 मोठ्या प्रकल्पांत 16.79 टक्के पाणीसाठा आहे़ परतीचा पाऊस नाही झाला तर या पाण्यावरच 24 लाख लोकसंख्येला आपली तहान भागवावी लागणार आहे. 

असे आहे पर्जन्यमान
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असून, लातूर तालुक्यात 4.2.1, औसा 361.2 अहमदपूर 516.9 निलंगा 473.7, उदगीर 435.8, चाकूर 552.2, रेणापूर 480.9, देवणी 432.9, शिरूर अनंतपाळ 514.1 आणि जळकोट तालुक्यात 477.7 मि़मी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस कमी असला तरी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्प भरले होते. शिवाय मांजरा प्रकल्पातही 80 टक्क्यांपुढे पाणीसाठा होता़ यंदा मात्र 3.4 टक्के पाणी आहे़ 

10 दिवसाआड शहराला पाणीपुरवठा.
पावसाने ताण दिल्यामुळे लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा 8 ऐवजी 10 दिवसांआड सुरू केला आहे़ मांजरा प्रकल्प तसेच साई, नागझरीत पाणी नसल्यामुळे महानगपालिकेने आतापासुनच पाणी जपून वापरण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

Web Title: 16 percent water supply in 142 projects in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.