महिलांत ‘कोल्हापूर ’ , पुरुषांत ‘सांगली’ ला सर्वसाधारण विजेतेपद:परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 11:11pm

कोल्हापूर : कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या पंचेचाळीसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावत ‘कोल्हापूर’ने, तर पुरुषांमध्ये ‘सांगली’ने

कोल्हापूर : कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या पंचेचाळीसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावत ‘कोल्हापूर’ने, तर पुरुषांमध्ये ‘सांगली’ने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. मुलांमध्ये संतोष माळी (सांगली), तर मुलींमध्ये जयश्री बोरगी (कोल्हापूर) यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून गौरविण्यात आले.

पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या २१ कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेत राहुल बोंदर (सोलापूर ग्रामीण), अमरसिंह पावरा (कोल्हापूर), धावणे स्पर्धेत पुरुषांमध्ये सांगलीने, महिलांमध्ये कोल्हापूर संघाने विजेतेपद पटकाविले. हॉकी (कोल्हापूर), बास्केटबॉल (सोलापूर ग्रामीण), व्हॉलीबॉल पुरुष ( सातारा),महिला (सांगली), महिला (सांगली), हॅण्डबॉल पुरुष (सोलापूर ग्रामीण) , खो-खो पुरुष ( सांगली), महिला (कोल्हापूर), कबड्डी पुरु ष (पुणे ग्रामीण) , महिला (कोल्हापूर), यांचा समावेश होता. सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाºया सांगली पुरुष संघाने स्पर्धेतून १४९ गुण, तर उपविजेतेपद पटकाविणाºया कोल्हापूर संघाने १४३ गुण मिळविले. महिलांमध्ये विजेत्या कोल्हापूर संघाने १२७, तर सांगलीने ११९ गुणांची कमाई केली.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,आमदार अमल महाडिक, महापौर हसिना फरास, हिंदकेसरी अमोल बुचडे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, कोल्हापूर पोलीस अधीक्षक सुनील मोहिते, सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी आदी उपस्थित होते. थेट पदोन्नती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविणाºयांना पोलीस दलातील कर्मचारी खेळाडूंना पोलीस दलातील ‘वर्ग दोन’च्या पदावर थेट पदोन्नतीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्याचे आश्वासन स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी दिले. त्यामुळे अमेरिकेतील पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर पोलीस दलाचे नाव साता समुद्रापार पोहोचविणाºया कोल्हापूर पोलीस दलातील आंतरराष्ट्रीय धावपटू जयश्री बोरगी हिचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वी दिले होते. याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या ४५ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे पुरुषांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाºया सांगली संघास विजेतेपदाचा करंडक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, कोल्हापूर पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपस्थित होते.

कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानात शुक्रवारी झालेल्या ४५ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे महिलांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाºया कोल्हापूर महिला संघास विजेतेपदाचा करंडक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, कोल्हापूर पोलीस अधीक्षक संजय मोहिते, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. वीरेश प्रभू, सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील,उपस्थित होते.  

 

संबंधित

जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर गुन्हा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन आमदारांसह १० जणांचा समावेश
कोल्हापुरात महिनाभरात विमानांचे उड्डाण; काम अंतिम टप्प्यात
 कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढीच्या निषेधार्थ प्रतीकात्मक अंत्ययात्रा
विश्वास नांगरे-पाटील यांनी राजीनामा द्यावा, अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणी शिवसेनेची मागणी
ऊसदराची कोंडी फुटली, पहिली उचल ‘एफआरपी अधिक २०० रुपये’

कोल्हापूर कडून आणखी

कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन
सिंह राशीतील उल्कावर्षावाचा आज रात्री बारा वाजता घ्या अनुभव
...तर ‘दौलत’ची विक्रीची निविदा : मुश्रीफ, ताळेबंदावर आक्षेप घेतल्यापासून कर्मचारी युनियनशी सुसंवाद संपला
कोल्हापूर पोलीस मुख्यालयासमोर महिलेचा पती-मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न
शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरु

आणखी वाचा