बदलीतील पैशाच्या वसुलीसाठीच अधिकाऱ्याच्या पत्नी, मुलीचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:46 AM2019-05-20T00:46:39+5:302019-05-20T00:46:43+5:30

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एक कोटी रुपये देऊनही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाºयाची पाहिजे तेथे बदली ...

The wife of the officer, daughter of Rada, has been charged for recovery of money | बदलीतील पैशाच्या वसुलीसाठीच अधिकाऱ्याच्या पत्नी, मुलीचा राडा

बदलीतील पैशाच्या वसुलीसाठीच अधिकाऱ्याच्या पत्नी, मुलीचा राडा

Next

एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एक कोटी रुपये देऊनही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाºयाची पाहिजे तेथे बदली न झाल्याने अधिकाºयाच्या पत्नी व मुलीने वकील महिलेकडे पैशांसाठी तगादा लावला होता. गेली आठ वर्षे हा वाद सुरू आहे. अखेर पैसे मिळत नसल्याच्या रागातून त्यांनी या वकिलाच्या घरात घुसून धुडगूस घातल्याचे पोलिसांच्या गोपनीय चौकशीत पुढे आले आहे.
दरम्यान, वकील महिलेच्या ओळखीतून गगनबावडा तालुक्यातील माजी सरपंचाने या अधिकाºयाकडून बदलीसाठी एक कोटी रुपये घेतल्याचे समजते.
ताराबाई पार्क येथे राहणाºया या वकील महिलेने, घरावर हल्ला करीत साहित्याची तोडफोड व धक्काबुक्की केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाºयाच्या पत्नी व मुलीच्या विरोधात शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महसूल विभागातील या वरिष्ठाची वकील महिलेशी २००९ पासून ओळख आहे. त्या महिलेचेही अधिकाºयाच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध आहेत. या अधिकाºयाला सोईच्या ठिकाणी बदली हवी होती. त्यासाठी त्याने वकील महिलेच्या मदतीने गगनबावडा तालुक्यातील ‘पाटील’ नावाच्या माजी सरपंचाची भेट घेतली. पाटील याने आपण अधिकाºयाची हवी तिथे बदली करून देतो असे सांगितले. त्याची मंत्र्यांसोबत ऊठबस असल्याने अधिकाºयाचाही विश्वास बसला. वकील महिलेच्या ओळखीतून या माजी सरपंचाने बदलीसाठी मांडवली करण्यासाठी एक कोटी रुपये घेतले. पैसे देऊनही बदली झाली नाही; त्यामुळे अधिकाºयाच्या पत्नीने वकील महिलेकडे पैशांची मागणी केली. तिने आपल्या ओळखीने ‘माजी सरपंच पाटील’ याने पैसे घेतले आहेत, त्याच्याकडून घ्या, असे सांगितले; परंतु ‘आम्ही पैसे तुमच्या विश्वासावर दिले आहेत. ते तुम्हीच दिले पाहिजेत,’ असे म्हणून गेली आठ वर्षे अधिकाºयाची पत्नी पैशांची मागणी करीत होती. माजी सरपंच पाटील यानेही पैसे पुढे दिल्याचे सांगून टाळाटाळ केली होती. संबंधित महसूल अधिकारी पैशाचे नाव काढत नव्हता. त्यांच्या पत्नीला हे खटकत होते. संतापलेल्या पत्नी व मुलीने अखेर वकील महिलेच्या घरात घुसून धुडगूस घातला.
शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी वकील महिलेला समोर बसवून अर्ज लिहून घेतला आहे. कट्टे यांनी चौकशी करून प्रकरणाची व्याप्ती मोठी व गुंतागुंतीची असल्याने त्यांनी हा अर्ज शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग केला आहे. येथील पोलिसांनी वकील महिलेला फोन करून रविवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते; परंतु त्या कामानिमित्त मुंबईला गेल्या आहेत. आज, सोमवारी त्या पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब देणार आहेत. या प्रकरणातून महसूल अधिकारी अडचणीत येणार असल्याने त्यावर पडदा टाकण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

माजी सरपंचाकडेही
होणार चौकशी
महसूल अधिकाºयाच्या बदलीमध्ये मांडवली करणारा माजी सरपंच गगनबावडा तालुक्यात प्रसिद्ध आहे. रमणमळा परिसरात राहून प्रशासकीय कामकाजात मांडवली करण्यामध्ये तो तरबेज आहे. तक्रारीमध्ये त्याचे नाव असल्याने शाहूपुरी पोलीस त्याच्याकडेही चौकशी करणार आहेत.

Web Title: The wife of the officer, daughter of Rada, has been charged for recovery of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.